Chhattisgarh Election Result 2023 Will Bjp Who Will Be New Chief Minister Cm Faces Of Congress Bjp Candidate In Race

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Chhattisgarh Assembly Elections Results 2023 : छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या 90 जागांसाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली आहे. छत्तीसगडमध्ये नवा मुख्यमंत्री कोण होणार याची सर्वांना उत्सुकता लागली आहे. देशातील 5 राज्यांतील विधानसभा निवडणुकांचा आज निकाल आहे.  या सर्व राज्यांच्या निवडणुकांकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीची सेमीफायनल म्हणूनही पाहिलं जात आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत कोणत्या पक्षाचे किती दिग्गज आहेत, याबाबत जाणून घ्या.

छत्तीसगडचा नवा मुख्यमंत्री कोण? 

छत्तीसगडमध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांनी प्रचारासाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती. राज्यात काँग्रेसची सत्ता आल्यास भूपेश बघेल (Bhupesh Baghel) यांना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, टीएस सिंह देव यांना मुख्यमंत्रीपदी संधी मिळू शकते, अशीही शक्यता आहे. भाजपचे तीन वेळा मुख्यमंत्री राहिलेले रमण सिंह (Raman Singh) यांचं नाव मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत आहे. या शर्यतीत खासदार विजय बघेल यांचंही नाव आहे. तरुण चेहऱ्यांवर भाजपने डाव खेळला तर केंद्रीय नेतृत्वाच्या जवळचे ओ.पी.चौधरी यांचं नावेही मुख्यमंत्री पदासाठी समोर येत आहे.

आज चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल

छत्तीसगडमध्ये 7 आणि 17 नोव्हेंबरला दोन टप्प्यात विधानसभा निवडणुका झाल्या. पहिल्या टप्प्यात 20 जागांवर मतदान झाले, त्यापैकी 12 बस्तर विभागातील नक्षलग्रस्त जागा होत्या. 7 नोव्हेंबरला मतदानादरम्यान काही ठिकाणी नक्षलवादी आणि सुरक्षा जवानांमध्ये चकमक पाहायला मिळाली. त्याचवेळी 17 नोव्हेंबरला 70 जागांवर मतदान झाले होते. आज चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. राजस्थान (Rajasthan Election Result 2023), मध्य प्रदेश (Madhya Pradesh Election Election Result 2023), छत्तीसगड ( Chhattisgarh Election Election Result 2023) आणि तेलंगणा (Telangana Election Election Result 2023) या चार राज्यांमध्ये मतमोजणी होणार आहे. 

एक्झिट पोल काय सांगतो?

छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे एक्झिट पोल ट्रेंड 30 नोव्हेंबर रोजी समोर आले होते. या ट्रेंडनुसार छत्तीसगडमध्ये पुन्हा काँग्रेसचे सरकार सत्तेवर येईल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. आजच्या चाणक्य, सी व्होटर आणि इतर अनेक एजन्सींनी त्यांच्या एक्झिट पोलमध्ये भाजपचा पराभव होणार असल्याचा दावा करण्यात आला आहे. छत्तीसगड विधानसभेत एकूण 90 जागांचा आज निकाल लागणार आहेत. सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक पक्षाला किमान 46 जागांची गरज आहे. 

अॅक्सिस मोई इंडियाच्या सर्वेक्षणानुसार, या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला 45 जागांवर विजय मिळेल. या सर्वेक्षणात भाजपला 41 जागा देण्यात आल्या आहेत. इतरांना चार जागा मिळू शकतात, असा अंदाज आहे. सी व्होटरच्या सर्वेक्षणानुसार, काँग्रेसला बहुमताच्या आकड्यापेक्षा 47 जागा अधिक म्हणजे एक जागा देण्यात आली आहे. भाजपला 42 तर इतर पक्षांना एक जागा देण्यात आली आहे.

[ad_2]

Related posts