[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Rajasthan Election Result 2023 : राजस्थानमध्ये भाजपने काँग्रेसला आस्मान दाखवत विजयाकडे प्रवास सुरू ठेवला आहे, राजस्थानच्या जनतेने काँग्रेसच्या ‘हाता’ची साथ सोडून भाजपच्या ‘कमळा’ला पसंती दिल्याचं स्पष्ट झालंय. अशातच आता मुख्यमंत्रीपदासाठी जी काही प्रमुख नावं येत आहेत, त्यामध्ये राजस्थानमधील योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) अशी ओळख असलेल्या बाबा बालकनाथ (Baba Balaknath) यांचं नाव आघाडीवर आहे. राजस्थानमधील तिजारा विधानसभा मतदारसंघातून (Rajasthan Tijara Election) भाजपचे उमेदवार बाबा बालकनाथ हे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.
बाबा बालकनाथ हे भाजपचे खासदार आहेत आणि मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीतून प्रसिद्धीझोतात आले. काँग्रेसने त्यांच्या विरोधात 36 वर्षीय माजी बसप नेते इम्रान खान यांना उमेदवारी दिली होती.
2019 साली पहिल्यांदा लोकसभा लढवली
सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत बालकनाथ यांनी अलवरमधून काँग्रेसच्या भंवर जितेंद्र सिंह यांचा पराभव केला. ते भाजपचे फायर ब्रँड नेते मानले जातात. खुद्द उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ योगी यांनीही त्यांच्या निवडणूक प्रचाराला हजेरी लावली होती. योगी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आले होते. योगी यांनी बालकनाथ यांच्यासाठी निवडणूक सभेलाही संबोधित केले होते. निवडणूक प्रचारादरम्यान त्यांची ‘भावी मुख्यमंत्री’ अशीही वर्णी लागली होती.
बालकनाथ हे हरियाणातील रोहतक येथील बाबा मस्तनाथ मठ अस्थल बोहरचे महंत चांदनाथ यांचे शिष्य आहेत. महंत चंदनाथ यांच्याशी त्यांची जवळीक आहे. 2019 मध्ये त्यांनी पहिली निवडणूक लढवली. त्यांनी भाजपच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक जिंकली होती. अवघ्या 38 वर्षांचे बालकनाथ हे मेवात परिसरात हिंदू नेते म्हणून ओळखले जातात.
पोलीस ठाण्यात घुसून डीएसपीला धमकावले होते
मीडिया रिपोर्ट्सनुसार, या वर्षीच्या सुरूवातीला म्हणजे जानेवारीमध्ये खासदार बालकनाथ यांनी बेहरोर, अलवर येथील पोलीस ठाण्यात घुसून डीएसपीला धमकावले होते. यानंतर पोलीस कर्मचारी आणि खासदार समर्थक आमनेसामने आले. भाजपच्या एका कार्यकर्त्याला ताब्यात घेतल्यावरून तो वाद झाला.
आतापर्यंतच्या ट्रेंडनुसार राजस्थानमध्ये भाजप 110 जागांवर आघाडीवर आहे. तर काँग्रेस 70 जागांवर आघाडीवर आहे. येथे विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांवर मतदान झाले असून मतमोजणी सुरू आहे.
राज्यातील व्हीआयपी जागांवर बोलायचे झाले तर मुख्यमंत्री अशोक गेहलोत सरदारपुरामधून आघाडीवर आहेत. तर भाजपचे राज्यवर्धन सिंह राठोड झोटवाडा येथून आघाडीवर आहेत. तर माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे पाटणमधून आघाडीवर आहेत. टोंक मतदारसंघातून सचिन पायलट आघाडीवर आहेत.
ही बातमी वाचा:
[ad_2]