Madhya Pradesh Election Result 2023 Four Reasons For BJP Victory Who Will Be CM Marathi News Abpp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Madhya Pradesh Election Result : तब्बल वीस वर्षांची अँटी इन्कंबन्सी असूनदेखील भाजपने मध्य प्रदेशात मोठा विजय संपादन केला आहे.  निवडणूक प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात भाजपने चतुराईने केलेले बदल या विजयाला कारणीभूत ठरलेत.  मध्य प्रदेशातील भाजपच्या विजयाची प्रमुख कारणे पाहूयात, 

1. भाजपने मुख्यमंत्रिपदाचा चेहरा या निवडणुकीत दिलाच नाही.  त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच भाजपच्या प्रचाराचा चेहरा होते. शिवराजसिंह चौहान यांच्या 18 वर्षे मुख्यमंत्री राहण्याने त्यांच्याबद्दल निर्माण झालेली अँन्टी इन्कंबन्सी आपोआप यामुळे झाकोळली गेली.  निवडणूक निकालानंतर शिवराजसिंह चौहान मुख्यमंत्री बनणार नाहीत ही चर्चा भाजपच्या गोटातून सातत्याने घडवून आणली गेली. ज्यामुळे बदल हव्या असलेल्या मध्य प्रदेशातील मतदारांना स्वतःकडे राखण्यात भाजपला यश आलं. 

2. लाडली बहेन योजनेने भाजपला महिलांची बंपर मते मिळवून दिली. महिलांच्या खात्यात थेट पैसे जमा व्हायला लागल्याने महिला मतदारांनी इतर सर्व प्रश्न बाजूला सारून कमळाच्या चिन्हावर बोट दाबलं. जून महिन्यात या योजनेला सुरुवात झाली. सुरुवातीला महिलांच्या खात्यात एक हजार रुपये जमा होऊ लागले. पुढे त्यामधे वाढ होऊन ते साडे बाराशे रुपये झाले. आणि निवडणुकीनंतर त्यामधे तीन हजार रुपयांपर्यंत वाढ करण्याच आश्वासन महिलांना देण्यात आलं. ज्यामुळे मोठ्या प्रमाणात महिलांच मतं भाजपला मिळाली. 

3. ज्या भागात भाजपसाठी निवडणूक अवघड ठरण्याची शक्यता होती तिथे भाजपने केंद्रीय मंत्र्यांना विधानसभेची निवडणूक लढवायला लावली. नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद पटेल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं. ज्यामुळे भाजपची संपूर्ण यंत्रणा पूर्ण क्षमतेने कामाला लागली. याचा परिणाम म्हणून मागील वेळी ज्या मुरैना आणि चंबळ खोर्‍यात भाजप उमेदवारांचा पराभव झाला होता तिथे देखील भाजपचा विजय झाला. 

4. कॉंग्रेसबाबत असलेली सहानुभूती मतदानामध्ये रुपांतरीत करण्यात कॉंग्रेस नेते कमी पडले. 2018 साली राज्यात सत्तेत आलेल कॉंग्रेस सरकार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी कॉंग्रेस सोडून भाजपमधे प्रवेश केल्याने गडगडले.  ज्यामुळे कमलनाथ यांच्याबद्दल लोकांमधे सहानुभूती निर्माण झाली. पण ही सहानुभूती मतदानात रुपांतरीत होऊ शकली नाही.

मध्य प्रदेशाचा मुख्यमंत्री कोण असेल? 

1. शिवराजसिंह चौहान हे वीस वर्षे मुख्यमंत्रिपदावर राहिल्याने त्यांच्याबद्दल एक प्रकारची नाराजी असल्याचं चित्र होतं. त्यामुळे भाजप पुन्हा शिवराजसिंह चौहान यांना संधी देण्याची शक्यता कमी आहे. 

2. नरेंद्र सिंह तोमर आणि प्रल्हाद पटेल हे विधानसभेला विजयी झाल्याने ते मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत असतील.  राजपूत असलेले नरेंद्र सिंह तोमर हे भाजपचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार असू शकतात. 

3. भाजप मध्य प्रदेशमधे नवीन चेहर्‍याचा विचार मुख्यमंत्रिपदासाठी करु शकतं. अनपेक्षितपणे मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची माळ नव्या व्यक्तीच्या गळ्यात पडून शकते.

ही बातमी वाचा :

[ad_2]

Related posts