Rajasthan Assembly Election Result Kanhaiya Lal Murder Case Udaypur Bjp Candidate Won Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rajasthan Assembly Election Results : राजस्थानच्या निवडणुकीत कन्हैयालालच्या हत्याकाडांचा (Kanhaiya Lal Murder Case) मुद्दा चांगलाच गाजला होता, या मुद्द्यावर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शांहांनी त्यांच्या भाषणात उल्लेख केला होता. कन्हैयालालही हत्याकांड झाल्यानंतर चर्चेत आलेल्या उदयपूर मतदारसंघात भाजपचे उमेदवार ताराचंद जैन यांनी काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांचा 32 हजार 711 मतांनी पराभव केला आहे. 

उदयपूर मतदारसंघात काही जिहादी मुस्लिम तरुणांनी दुकानात घुसून कन्हैयालाल टेलरची दिवसाढवळ्या हत्या केली होती. त्या घटनेचं रेकॉर्डिंग करुन त्याचे व्हिडीओ व्हायरल केले होते. हा मुद्दा नंतर खूप गाजला होता. या मुद्द्यावरून त्यावेळी विरोधात असलेल्या भाजपने काँग्रेसवर आरोप केले होते. त्यामुळे अशोक गेहलोत सरकार चांगलंच अडचणीत आलं होतं. 

कन्हैयालाल हत्येचा मुद्दा हा राजस्थानमधील निवडणुकीतही चांगलाच गाजला. या मुद्द्यावरून भाजपने गेहलोत सरकारला नामोहरम करून टाकल्याचं दिसून आलं. 

निवडणुकीच्या प्रचारात महत्त्वाचा मुद्दा (Kanhaiya Lal Murder Case) 

पंतप्रधान मोदी आणि अमित शहा यांनी त्यांच्या सभांमध्ये कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा उल्लेख केला होता. भाजपने गेहलोत सरकारवर तुष्टीकरणाचा औपचारिक आरोप केला होता. जून 2022 मध्ये झालेल्या या हत्याकांडाच्या निमित्ताने भाजपने येथे काँग्रेसला कोंडीत पकडले. आपल्या एका रॅलीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कन्हैयालालच्या हत्येचा उल्लेख केला होता आणि म्हणाले होते की, काँग्रेस राजस्थानची परंपरा धोक्यात आणत आहे. काँग्रेसच्या राजवटीत कॅमेऱ्यांसमोर जे काही घडले, त्याची कल्पनाही कोणी करू शकत नाही. हा खून काँग्रेस सरकारवर मोठा डाग आहे. यासोबतच गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या सभांमध्ये कन्हैयालाल हत्या प्रकरणाचा अनेकदा उल्लेख केला. त्या उदयपूर मतदारसंघात भाजपच्या उमेदवाराला मोठं मताधिक्य मिळालंय.

भाजप उमेदवार ताराचंद जैन हे 32 हजार 771 मतांनी विजयी झाले. टीवी डिबेटमध्ये काँग्रेसची बाजू मांडणारे प्रवक्ते गौरव वल्लभ यांचा त्यांनी पराभव केला. उदयपूर मतदारसंघ 1972 पासून जनसंघ, भाजपाचच पारंपरिक  मतदारसंघ राहिला आहे. 1985 आणि 1998 अशा फक्त दोन वेळा तिथे काँग्रेस जिंकू शकली आहे.

या मतदारसंघात भाजपच्या गुलाबचंद कटारिया यानी सहा वेळी विजय प्राप्त केला आहे. त्याआधी 2003 ते 2018 असे सलग चार वेळा ते जिंकले होते. यावेळी भाजपने ताराचंद जैन यांना तिकिट दिलं  होतं. त्यांना 97 हजार ४६६ मतं पडली. काँग्रेसच्या गौरव वल्लभ यांना 64 हजार 695 इतकी मतं पडली. 

काय होतं कन्हैयालाल हत्याकांड प्रकरण? (What Is Kanhaiya Lal Murder Case) 

जून 2022 मध्ये सुप्रीम टेलर दुकानाचा मालक कन्हैयालाल याची हत्या करण्यात आली होती. उदयपूरच्या सर्वात गजबजलेली बाजारपेठ असलेल्या मालदास स्ट्रीटच्या भूत महल गलीमध्ये त्याचं दुकान होतं. त्याच्या दुकानात  रियाझ अटारी आणि गोस मोहम्मद हे दोन इसम घुसले आणि त्यांनी धारदार शस्त्राने कन्हैयालालची हत्या केली होती. दोन्ही आरोपींना त्याच दिवशी अटक करण्यात आली. मारेकऱ्यांनी या घटनेचा व्हिडीओही शूट केला होता.  या घटनेचा देशभरातून निषेध करण्यात आला.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts