Congress Rahul Gandhi Gets Set Back Assembly Election Results 2023 Why Congress Lost Madhya Pradesh Rajasthan Chhattisgarh

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Why Congress Rahul Gandhi :  रविवारी जाहीर झालेल्या चार राज्यांच्या निवडणूक निकालांमध्ये काँग्रेसला (Congress) राजस्थान (Rajasthan), मध्य प्रदेश (Madhya Pradesh) आणि छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) काँग्रेसला (Congress) पराभवाचा सामना करावा लागला. राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. तर, तेलंगणामध्ये पक्षाला अपेक्षित यश मिळाले. मात्र, काही विजयाची अपेक्षा असताना आणि चांगल्या योजना असतानाही राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये काँग्रेसला सत्ता गमवावी लागली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी असताना काँग्रेसचा हा पराभव म्हणजे पक्षासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. 

कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशमधील जोरदार विजयानंतर काँग्रेस हा ‘इंडिया’ या विरोधी पक्षांच्या आघाडीचा मजबूत आधारस्तंभ बनण्याच्या मार्गावर होती. आता हा पराभव त्यात मोठा अडथळा ठरणार आहे. त्याचवेळी राहुल गांधींनाही या निकालांमुळे मोठा फटका बसण्याची शक्यता होती. गेल्या वर्षी आपल्या भारत जोडो यात्रेद्वारे राहुल गांधी यांनी देशात काँग्रेससाठी फक्त सकारात्मक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही तर स्वत:ला एक गंभीर नेता म्हणून लोकांसमोर आणले. त्याचमुळे मल्लिकार्जुन खरगे काँग्रेसचे अध्यक्ष असतानाही राहुल गांधी लोकांमध्ये काँग्रेसचा चेहरा बनले होते. 

काँग्रेसचा पराभव काँग्रेसने केला?

हिंदी पट्ट्यातील राज्यांमध्ये काँग्रेसच्या या लाजिरवाण्या पराभवासाठी इतर घटकांपेक्षा काँग्रेसलाच जबाबदार धरले जात आहे. या पराभवानंतर कर्नाटक आणि हिमाचल प्रदेशच्या विजयानंतर काँग्रेसमध्ये आलेला अतिआत्मविश्वास आणि गर्व हे नडलं असल्याचे म्हटले जात आहे. काँग्रेसच्या राज्य पातळीवरील नेत्यांनी राष्ट्रीय नेतृत्व आणि पक्षाच्या अभिप्रायाकडे दुर्लक्ष केले आणि स्वतःच्या जिद्द आणि इच्छाशक्तीच्या आधारे निवडणुकीचे निर्णय घेतले. त्याच्या परिणामी पक्षाला पराभव स्वीकारावा लागला. अशोक गेहलोत, कमलनाथ आणि भूपेश बघेल या नेत्यांनी तिकीट वाटप करताना पक्षाच्या सर्वे रिपोर्टला बगल देत आपापल्या पद्धतीने तिकीट वाटप केल्याची चर्चा आहे. 

तर, काही ठिकाणी तिकीट वाटपासाठी पैसे घेण्यात आल्याचाही आरोप करण्यात आला. राजस्थानमध्ये अशोक गेहलोत सरकारने चांगले काम केले. विविध योजनांचा फायदा लोकापर्यंत पोहचला. मात्र, स्थानिक पातळीवर विद्यमान आमदारांविरोधात मोठ्या नाराजीचे वातावरण होते. तर गटबाजीचा फटका काँग्रेसला बसला. तर, मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ  यांच्याकडे पक्षाची एकहाती सूत्रे होती. कमलनाथ यांच्याशिवाय कोणताच निर्णय होत नसल्याची तक्रार समोर येत होती. काँग्रेसच्या नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी कुटुंबीय, निकटवर्तीय आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर विश्वास ठेवला. त्याच्या परिणामी काँग्रेसचा केडर फारसा सक्रिय दिसला नाही. 

वादग्रस्त मुद्यांवरील मौनाचा फटका

द्रमुक पक्षाचे नेते उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातनची डेंग्यू आणि मलेरियाशी तुलना करून वादाला तोंड फोडले होते. ज्यात काँग्रेसचे मौन आणि काही नेत्यांची बेताल वक्तव्ये याचा फायदा भाजपने मोठ्या प्रमाणावर घेतला. या मुद्याला निवडणुकीच्या आधी तापवण्यात आले. यामुळे मोठ्या प्रमाणावर ध्रुवीकरण झाले आणि काँग्रेसच्या बाजूने झुकलेला मतदार पुन्हा एकदा भाजपच्या बाजूने गेला असल्याचे म्हटले जात आहे. 

छत्तीसगडमध्ये ही मुख्यमंत्री भूपेश बघेल यांच्या कार्यपद्धतीवर अनेकांना आक्षेप घेतला होता. पक्षांतर्गत गटबाजीदेखील उफाळून येत होती. सरकारवर असलेल्या भ्रष्टाचाराचे आरोप, वरिष्ठ नेत्यांमधील गटबाजी आणि बघेल यांच्या मनमानी कारभाराला जबाबदार धरले जात आहे. काँग्रेस हिंदी पट्ट्यातील जात जनगणना आणि ओबीसींचा मुद्दा उचलून धरत होती, त्याचा फायदा होईल असे म्हटले जात होते. मात्र, काँग्रेस लोकांसाठी प्रभावीपणे काम करू शकेल, असा विश्वास मतदारांना वाटला नसावा हेदेखील एक कारण असल्याचे म्हटले जात आहे. 

राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसची वाट बिकट?

आज लागलेल्या निकालांचा परिणाम विरोधकांच्या इंडिया आघाडीवर होणार हे स्पष्ट आहे.  विरोधकांची आघाडी तयार करण्यात काँग्रेसने महत्त्वाची भूमिका बजावली. मात्र, आजच्या निकालाने त्यांना झटका बसला आहे. इंडिया आघाडीच्या आगामी बैठकीत काँग्रेसची वाटाघाटी करण्याची ताकद कमी होणार असल्याचे  म्हटले जाऊ लागले आहे. इंडिया आघाडीतील प्रादेशिक पक्ष आता अधिक आक्रमक होण्याची शक्यता आहे. निवडणुकीपूर्वीच जेडीयू आणि नितीश कुमार यांनी पाच राज्यांच्या निवडणुकीत भारत आघाडीबाबत काँग्रेसवर उदासीनता असल्याचा आरोप केला होता. तर मध्य प्रदेशमध्ये जागा वाटपावरून काँग्रेस आणि सपा नेते अखिलेश यादव आमनेसामने आले आहेत. आगामी काळात सपा, जेडीयू, टीएमसी, आप यासारखे पक्ष आघाडीत काँग्रेसकडे अधिक जागांची मागणी करत आपल्या राज्यांमध्ये अधिक जागांची मागणी करू शकतात. 

[ad_2]

Related posts