Rajendra Singh Gudha Lost From Udaipurwati Rajasthan Lal Diary Case Bjp Candidate Won Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Udaipurwati Seat Result 2023: राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव होऊन भाजप सत्तेत आलं आहे (Rajasthan Election Result 2023). काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारला पराभवाचा सामना करायला लागला आहे. भाजपने काँग्रेस सरकारच्या विरोधात ज्या मुद्द्यावरून रान उठवलं त्यापैकी एक मुद्दा म्हणजे लाल डायरी (Rajasthan Lal Diary Case). याच मुद्द्यावरून भाजपने गेहलोत सरकारला घेरलं आणि त्यांचा कार्यक्रम केला. पण लाल डायरीचा मुद्दा ज्यांनी उठवला त्या शिवसेना शिंदे गटाच्या एकमेव उमेदवाराचा म्हणजे राजेंद्र सिंह गुढा (Rajendra Singh Gudha) यांचा पराभव झाला आहे. उदयपूरवाटी मतदारसंघातून भाजपच्या शुभकरण चौधरी यांनी राजेंद्र गुढा यांचा पराभव केला आहे. 

शिवसेना शिंदे गटातून निवडणूक लढवणाऱ्या राजेंद्र सिंह गुढा यांनी लाल डायरीच्या मुद्द्यावरून काँग्रेसच्या अशोक गेहलोत सरकारवर चांगलेच आरोप केले. हा मुद्दा भाजपने मोठ्या प्रमाणात उचलला आणि त्याचा फायदाही पक्षाला झाला. त्यातून भाजपची सत्ता आली पण स्वतः राजेंद्र गुढा यांचा पराभव झाला.

कोण आहेत राजेंद्र गुढा? (Who Is Rajendra Singh Gudha)

राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील उदयपुरवाटी मतदार संघाचे आमदार राजेंद्र हे गुढा गावात राहणारे आहेत.राजेंद्र यांनी आपल्या नावासोबत गुढा या गावाचे नाव देखील जोडले आहे. त्यानंतर ते राजेंद्र गुढा या नावाने ओळखले जातात. राजेंद्र गुढा यांनी 2018 साली बहुजन समाज पार्टीच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. सलग दोन वेळा ते आमदार म्हणून निवडून आले आहेत.

काय आहे लाल डायरी? ( What Is Lal Diary )

राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लाल डायरीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलंत तापलं होतं. काही दिवसांपूर्वी एका लाल डायरीत राजस्थानमधील गेहलोत सरकारच्या भ्रष्टाचाराचा आलेख असल्याचा उल्लेख अमित शाहांनी केला होता. तेव्हापासूनच राजस्थानच्या राजकारणात खळबळ माजली होती. हीच लाल डायरी राजेंद्र गुढांकडे असल्याचं बोललं जात आहे.  भाजपने तर आपल्या निवडणुकीच्या भाषणांमध्ये जाहीरपणे आपण सत्तेत आलो तर लाल डायरीची चौकशी करणार असल्याचं सांगितलं होतं. 

गुढा यांनी लाल डायरीची तीन पानं प्रसिद्ध 

आरटीडीसीचे अध्यक्ष धर्मेंद्र सिंह राठोड यांच्या घरावर पडलेल्या इन्कम टॅक्सच्या छाप्यापूर्वी ही लाल डायरी आणण्यात आली होती, असा दावा राजेंद्र गुढा यांनी विधानसभेत केला होता. त्या दिवशी राजस्थानच्या विधानसभेत मोठा गदारोळ झाला होता. लाल डायरीबाबत गुढा यांनी गेहलोत सरकारविरोधात सातत्यानं आरोपांची माळच लावली होती.  

राजेंद्र गुढा यांनी लाल डायरीची तीन पानंही प्रसिद्ध केली होती, ज्यात आरसीए निवडणुकीतील व्यवहारांचा उल्लेख होता. तेव्हापासूनच भाजपनं सातत्यानं लाल डायरी हा निवडणुकीचा मुद्दा बनवला. भाजपच्या परिवर्तन यात्रेच्या सभांमध्ये अमित शहांपासून जेपी नड्डा यांच्यापर्यंत प्रत्येक नेत्यानं लाल डायरीच्या मुद्द्यावरून गेहलोत सरकारला घेरलं होतं. आता त्याचा भाजपला राजकीय फायदा झाला असून भाजपने स्पष्ट बहुमत प्राप्त केलं आहे. 

ही बातमी वाचा: 

 

[ad_2]

Related posts