Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning 4th December 2023 Assembly Election Result Maharashtra Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील…

Cyclone Michaung : मिचॉन्ग चक्रीवादळाचं संकट! 5 डिसेंबरला धडकणार; किनारी भागात अलर्ट जारी

Weather Update Today : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याचं चक्रीवादळात (Cyclone Michaung) रुपांतर झालं आहे. आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) आणि ओडिशा (Odisha) किनारपट्टीला चक्रीवादळाचा तडाखा बसण्याचा अंदाज आहे. दरम्यान चक्रीवादळाचा परिणाम किनारपट्टी भागात दिसून येईल तामिळनाडू, चेन्नई आणि पुदुच्चेरीमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. रविवारी रात्रीपासूनच या भागात अति मुसळधार पाऊस सुरु आहे. महाराष्ट्रातही काही जिल्ह्यांमध्ये पुढील 24 तास जोरदार पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे. वाचा सविस्तर…

PM Modi in Sindhudurg : पंतप्रधान मोदी आज सिंधुदुर्ग जिल्ह्यात; नौदल दिनाच्या कार्यक्रमात राहणार उपस्थित, छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे होणार अनावरण

सिंधुदुर्ग : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) हे आज  सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. भारतीय नौदल दिनानिमित्ताने तारकर्ली येथे होणाऱ्या कार्यक्रमात पंतप्रधान मोदी उपस्थित राहणार आहेत. त्याशिवाय, पंतप्रधानांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे. वाचा सविस्तर…

Maharashtra Weather : पुढील 24 तासांत मेघगर्जनेसह पावसाची शक्यता, चक्रीवादळाचा राज्याच्या वातावरणावरही परिणाम

Maharashtra Weather Update : बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचं तीव्र दाब क्षेत्रात रूपांतर झालं आहे. त्यामुळे त्याचे आता मिचॉन्ग चक्रीवादळात (Cyclone Michaung) रूपांतर झालं आहे. त्यामुळे 4 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे भारतीय हवामान विभागाने तमिळनाडू, आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत महाराष्ट्रातही पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे. वाचा सविस्तर…

Election Results 2023 : मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगणाला मिळणार नवे मुख्यमंत्री, निकालानंतर आता सुरू होणार मुख्यमंत्रीपदाची शर्यत

Assembly Election Results 2023 : मध्य प्रदेश (Madhya Pradesh), छत्तीसगड (Chhatisgarh), राजस्थान (Rajsathan) आणि तेलंगणा (Telangana) या चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे निकाल रविवारी समोर आले. मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय मिळवला आहे, तर तेलंगणात काँग्रेसने भारत राष्ट्र समितीचा (BRS) पराभव करून सत्ता काबीज करण्यात यश मिळवलं आहे. आता या चार राज्यांना नवे मुख्यमंत्री मिळतील. चारही राज्यांमध्ये मुख्यमंत्र्यांचे नाव निश्चित होईल आणि त्यानंतर शपथविधी सोहळा आयोजित केला जाईल. वाचा सविस्तर…

Parliament Winter Session : आजपासून संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात, सरकारला कोंडीत पकडण्यासाठी ‘इंडिया’ आघाडीची बैठक

Parliament Winter Session : आजपासून संसदेचं हिवाळी अधिवेशन (Parliament Session) सुरू होत आहे. हे अधिवेशन (Winter Session) चांगलंच गाजण्याची शक्यता आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन 4 डिसेंबरपासून सुरू होणार असून 22 डिसेंबरपर्यंत चालणार आहे. तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीतील (Assembly Election Results 2023) पराभवामुळे निराश झालेले विरोधक एकत्र येऊन बेरोजगारी, महागाई, मणिपूर हिंसाचार आणि तपास यंत्रणांचा वापर यावरून सत्ताधारी भाजपवर हल्लाबोल करतील. ऐतिहासिक विजय मिळवलेला भाजप विरोधकांवर हल्लाबोल करण्याचीही शक्यता आहे. वाचा सविस्तर…

4th December In History : भारतीय नौदलाचा पाकिस्तानवर हल्ला, सती प्रथेवर बंदी, अभिनेते शशी कपूर यांचे निधन; आज इतिहासात…

4th December In History :  इतिहासात प्रत्येक दिनाचे एक महत्त्व असते. आजच्या दिवसाचेही भारताच्या दृष्टीने खूप महत्त्व आहे. आजच्या दिवशी भारतीय नौदलाने 1971 मध्ये पाकिस्तानच्या कराची बंदरावर हल्ला केला. या हल्ल्यात पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले. या पराक्रमाच्या स्मरणार्थ 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदल दिन साजरा करण्यात येतो. सामाजिकदृष्टीने आजचा दिवस महत्त्वाचा आहे. आजच्या दिवशी ब्रिटिशांनी भारतात सती प्रथेवर बंदी घातली. वाचा सविस्तर…

Horoscope Today 4 December 2023 : आजचा सोमवार खास! मेष ते मीन राशीच्या लोकांसाठी कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या

Horoscope Today 4 December 2023 : राशीभविष्यानुसार, आज म्हणजेच 4 डिसेंबर 2023, सोमवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार, आज मिथुन राशीच्या लोकांच्या पगारात वाढ होऊ शकते. तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून पूर्ण सहकार्य मिळेल. आज कन्या राशीच्या लोकांना व्यवसायात अडचणींचा सामना करावा लागू शकतो. सर्व राशीच्या लोकांसाठी सोमवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य वाचा सविस्तर…

[ad_2]

Related posts