पैशांचा पाऊस! भोंदू बाबाने तरूणाला लावला 18 लाखाचा चुना, पुण्यातील हडपसरमधील प्रकार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

पुणे :  पुणे, शिक्षणाचे माहेर घर का जादू टोण्याची नगरी असा प्रश्न अलीकडे पडत आहे.  पैशांचा पाऊस पडतो  म्हणून  पुण्यातील (Pune News) हडपसरमधील एका तरूणांचे  मांत्रिकाने तब्बल अठरा लाखांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. पुण्यातील हडपसर (Pune Hadapsar) परिसरात असलेल्या ससाणे नगर परिसरात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पाच लाखाचे पैसे बदलून कोट्यावधी रुपयांच्या पैशाचा पाऊस पडतो असे सांगत तरुणाला 18 लाख रुपयांना  गंडा घातला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांत्रिक आईरा शॉबने माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून पैशाचा पाऊस पडतो असं आमिष अनेकांना दाखवत गंडा घालत होता. मांत्रिकांची आणि फिर्यादी छोटेलाल परदेशी यांची एका मित्रमार्फत  भोंदू बाबा यांच्याची ओळख झाली. त्याने पैशाचा पाऊस पडतो असे सांगून फिर्यादी यांना एक अघोरी पूजा मांडायला सांगितली. पूजा सुरू असताना अचानक त्या ठिकाणी काही तोतया पोलिस आले. त्यांनी बाबासाह तरुणाला मारहाण करत या ठिकाणी पूजेसाठी ठेवलेले 18 लाख रुपये घेऊन पसार झाले. हा सगळा डाव या भोंदू बाबाने रचला हे कळताच फिर्यादी यांनी पोलीस ठाणे गाठले. भोंदू बाबा आईरा शॉब यांच्यासह माधुरी मोरे , रॉकी वैद्य आणि किशोर पंडागळे अशा चार जणांवर हडपसर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

आमिषाला बळी पडू नका, पुणे पोलिसांचे आवाहन

अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना बळी पडू नये यासाठी वर्षानुवर्षे आवाहन करण्यात येते. परंतु तरी देखील पैशाच्या लोभापायी अनेक नागरिक आजही अशा प्रकारच्या अनिष्ट प्रथांना बळी पडत असल्याचं या घटनेवरून स्पष्ट होते. या सगळ्या कारवाईनंतर अशा मांत्रिकांच्या आमिषाला बळी पडू नका, बळी पडलेले असाल तर पोलिसांकडे तक्रार करा असं आवाहन पुणे पोलिसांनी (Pune Police)  आवाहन केल आहे.

झटपट पैसे मिळवण्याचा लोभ असलेल्या  राज्यात निरनिराळ्या ठिकाणी अशा प्रकारे भोंदूगिरीने लुबाडणूक  केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे अशा मांत्रिकांच्या आमिषाला बळी पडू नका, असे आवाहन प्रशासनांकडून करण्यात आले आहे. 

हे ही वाचा:

Pune Crime News : ज्वेलर्सवर मालकावर चाकूने हल्ला केला अन् चप्पल तिथेच विसरला, पोलिसांनी आरोपीला गाठलं, ‘त्या’ रात्री पुण्यात नेमकं काय घडलं?

 

[ad_2]

Related posts