[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IMD Update for Cyclone Michaung : मिचॉंग चक्रीवादळाचा फटका लक्षात घेता चेन्नई विमानतळावर उतरणारे 33 विमाने बंगळुरू विमानतळाकडे वळवण्यात आले आहेत. या चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशला बसण्याची शक्यता असल्याने ही खबरदारी घेण्यात आली आहे. या 33 विमानसेवांमध्ये इंडिगो, स्पाईसजेट, इतिहाद, गल्फ एअर यांचा समावेळ आहे. तर चेन्नईला येणारे काही विमान रद्द करण्यात आली आहेत.
बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या दाबाच्या पट्ट्याचे उच्च दाब क्षेत्रात रूपांतर झाले आहे. त्यामुळे त्याचे आता चक्रीवादळ मिचॉन्गमध्ये रूपांतर झाले आहे. त्यामुळे 4 डिसेंबर ते 5 डिसेंबरपर्यंत देशभरात मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. अनेक भागात पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशच्या किनारपट्टीसाठी भारतीय हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. येत्या 24 तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवकाळी पाऊस सुरू आहे. त्यामुळे आधीच शेतीचे मोठे नुकसान झाले असून आता पुन्हा एकदा राज्यात पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मेघगर्जनेसह पाऊस पडू शकतो
मिचॉंग चक्रीवादळामुळे येत्या 24 तासांत महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागरात आज चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. राज्यात अवकाळी पाऊस होताना दिसत आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या चक्रीवादळामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडू शकतो. येत्या 24 तासांत महाराष्ट्रात पाऊस आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता IMD ने वर्तवली आहे.
कुठे पाऊस पडू शकतो?
मिचॉंग चक्रीवादळामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी NDRF ने तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरी येथे 21 टीम तैनात केल्या आहेत. आठ अतिरिक्त टीम राखीव ठेवण्यात आले आहेत. कॅबिनेट सचिव राजीव गौबा यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन समितीच्या (NCMC) बैठकीत चक्रीवादळासाठी राज्य सरकारे आणि केंद्रीय मंत्रालये आणि विभागांच्या तयारीचा आढावा घेण्यात आला. आम्ही तुम्हाला इथे सांगतो की मिचॉन्ग चक्रीवादळाबाबत प्रशासनाने सर्वांना आधीच अलर्ट केले आहे.
चक्रीवादळामुळे 144 गाड्या रद्द
चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर देशाच्या पूर्व किनारपट्टीवरील राज्यांच्या सरकारच्या सतत संपर्कात असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी सांगितलं. चक्रीवादळामुळे दक्षिण मध्य रेल्वेने 144 गाड्या रद्द केल्या आहेत. पंतप्रधान मोदी यांनी रविवारी मिचॉन्ग वादळाच्या संदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय. एस. जगन मोहन रेड्डी यांच्याशी बोलून त्यांना सर्वतोपरी मदत करण्याचं आश्वासन दिलं आहे.
ही बातमी वाचा:
[ad_2]