Lok Sabha Election 2024 BJP Mission 400 How It Will Be Possible Know About It

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Lok Sabha 2024 BJP vs Congress :  तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशानंतर भाजपने (BJP) आगामी लोकसभा निवडणुकीसाठीच्या (Lok Sabha Election 2024) तयारीला आणखी वेग दिला आहे. त्यादृष्टीने संघटनात्मक पातळीवर काम सुरू असून दुसरीकडे केंद्र सरकारदेखील आगामी काही दिवसात लोकप्रिय घोषणा करण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपकडून आता 400 हून (BJP Mission 400 +) अधिक जागा जिंकण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपकडे सर्वाधिक लोकसभेच्या जागा आहेत. त्यामुळे आता ही कामगिरी पुन्हा एकदा करण्याची तयारी भाजपने केली आहे. त्याशिवाय, ‘मिशन 400’ गाठण्यासाठी भाजपला देशभरातील सर्व राज्यांमध्ये जागा जिंकाव्या लागणार आहेत. 

हिंदी भाषिक राज्यांमध्ये भाजपचे वर्चस्व

लोकसभा निवडणुकीला जवळपास पाच महिने उरले आहेत. तीन राज्यांमध्ये लोकसभेच्या 65 जागा भाजपने जिंकल्या आहेत, त्यापैकी सध्या भाजपकडे 61 जागा आहेत. बिहार, उत्तर प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, मध्य प्रदेश, दिल्ली, झारखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या हिंदी भाषिक राज्यांमध्ये 193 जागा आहेत. या राज्यांतील 177 जागांवर भाजपचे खासदार आहेत. 

भाजपसमोर या राज्यांतील आपल्या जागा टिकवून ठेवण्याचेच नव्हे तर संख्याबळ वाढवण्याचे आव्हान आहे. 11 राज्यांमध्ये जागा वाढण्यास फारसा वाव नाही. उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये भाजप सर्वाधिक जागा जिंकू शकेल असे गृहित धरले तरी  पूर्ण बहुमत मिळवण्यासाठी पश्चिम बंगाल, आसाम, महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये 2019 च्या कामगिरीची पुनरावृत्ती करावी लागेल. 2019 च्या निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये 18 जागा, महाराष्ट्रात 23 जागा आणि गुजरातमध्ये सर्व 26 जागा जिंकल्या. बंगाल, महाराष्ट्रात चांगल्या कामगिरीसाठी भाजपला जोर लावावा लागणार आहे. 

‘मिशन 400’ ची वाट अधिक बिकट 

मागील दोन लोकसभा निवडणुकीत भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या चेहऱ्यावर मैदानात उतरली.  त्याच्या परिणामी भाजपला पूर्ण बहुमत मिळाले. मात्र, मोदी लाट असतानादेखील भाजपला काही राज्यांमध्ये खाते उघडा आले नाही. भाजपने काश्मीर ते बिहार या उत्तर भारतातील सर्व जागा जिंकल्या तरी त्यांना 245 जागा मिळतील. मात्र, एवढं निर्भेळ यश मिळवणे भारतीय राजकारणात कठीण आहे. त्याशिवाय भाजपला 400 जागा मिळवण्यासाठी केरळ, पश्चिम बंगाल, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, तेलंगणा, आंध्र प्रदेश या राज्यांमध्येदेखील प्रत्येकी किमान 10 जागांवर विजय मिळवावा लागणार आहे. ही बाबदेखील आव्हानात्मक आहे. या राज्यांतील एकूण 118 जागांपैकी भाजपकडे फक्त चार जागा आहेत, ज्या तेलंगणात जिंकल्या होत्या. 

कर्नाटक सावरणार की फटका बसणार?

2024 च्या लोकसभा निवडणुकीत कर्नाटकातही भाजपला आव्हान असू शकते. गेल्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने दक्षिण भारतीय राज्यात 28 पैकी 25 जागा जिंकल्या होत्या. यावेळी पक्षाने जनता दल सेक्युलरसोबत युती केली आहे. या युतीमुळे भाजपला आता जेडीएसला 4 जागा द्याव्या लागणार आहेत. म्हणजेच चांगल्या कामगिरीसाठी भाजपला आपल्या वाटेला आलेल्या सर्व 24 जागा जिंकाव्या लागतील.  

कर्नाटकात सत्ताबदल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात काँग्रेसचा प्रभाव वाढला आहे. ‘इंडिया’ आघाडीत असलेल्या  राजद आणि जेडीयूचीही बिहारमध्ये ताकद आहे. या राज्यात स्वतःच्या जागा वाढवणे हेही भाजपसाठी आव्हान आहे. 2014 च्या निवडणुकीत भाजपला स्वबळावर सर्वाधिक 22 जागा जिंकता आल्या होत्या. 

पूर्व भारतात आव्हानात्मक स्थिती 

ओडिशात भाजपचे फक्त आठ लोकसभेचे खासदार आहेत, तर बीजेडीकडे 20 जागा आहेत. या पूर्वेकडील राज्यातही भाजपच्या विस्ताराला भरपूर वाव आहे, पण नवीन पटनायक यांच्या प्रतिमेसमोर फारशी अपेक्षा करणे सोपे नाही. भाजपला बंगालमधील 19 जागांच्या जुन्या विक्रमाच्याही पुढे जावे लागणार आहे.

मागील निवडणुकीत आंध्र प्रदेश, केरळ आणि तामिळनाडूमध्ये भाजपचे खाते उघडले नाही. एनडीएचा पहिला भागीदार अण्णाद्रमुकने भाजपची साथ सोडली आहे.  

ईशान्येकडील राज्यांतील लोकसभेच्या एकूण 25 जागांपैकी आतापर्यंत 11 जागांवर भाजपला विजय मिळवता आला आहे.  प्रादेशिक पक्षांच्या भक्कम स्थितीमुळे भाजप किती जागा जिंकतो हे पाहणे आवश्यक आहे. 400 चा टप्पा ओलांडण्यासाठी भारतीय जनता पक्षाला सर्व 25 जागा जिंकाव्या लागतील. याशिवाय भाजपलाच गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र आणि कर्नाटकामध्ये भाजपला निर्भेळ यश मिळवावे लागणार आहे. 

राजकीय समीकरणात बदल

2019 च्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील, देशातील राजकीय परिस्थितीत बदल झाला आहे. 2019 च्या निवडणुकीत भाजपसोबत असणारे मित्रपक्षांमध्ये फूट पडली आहे किंवा त्यांनी भाजपची साथ सोडली आहे. महाराष्ट्रात शिवसेनेचे दोन गट झाले आहेत. बिहारमध्ये नितीशकुमार आता महागठबंधन सोबत आहेत. पंजाबमध्ये शिरोमणी अकाली दलाने भाजपची साथ सोडली आहे. पंजाबमध्ये काँग्रेस, आप, शिरोमणी अकाली दलासोबत भाजपला दोन हात करावे लागणार आहेत. काश्मीरमध्येही 370 कलम हटवल्यानंतर पहिल्यांदा लोकसभा निवडणूक होणार आहे. 

महाराष्ट्रात भाजप हा राष्ट्रवादी (अजित पवार गट) आणि शिवसेना (शिंदे गट) यांच्यासोबत युती करून निवडणूक लढवणार आहे. 48 जागा असलेल्या महाराष्ट्रात भाजपला मित्रपक्षांसोबत जागा वाटून घ्याव्या लागणार आहेत. भाजपने उत्तर प्रदेशातही नवे मित्रपक्ष सोबत घेतले आहेत.

2019 च्या निवडणुकीत भाजपला 303 जागा मिळाल्या होत्या. 2024 च्या निवडणुकीत भाजपला कर्नाटक व्यतिरिक्त दक्षिण भारतातील राज्यांमध्ये 70 जागा मिळवाव्या लागतील.

इंडिया आघाडी आव्हान देईल?

भाजपविरोधात विरोधकांकडून एकास एक उमेदवार देण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. त्या दृष्टीने इंडिया आघाडी स्थापन करण्यात आली आहे. भाजपला मतविभागणीचा फायदा मिळू नये यासाठी एकास एक उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे. देशभरातील लोकसभेच्या 543 पैकी किमान 350 जागांवर भाजपविरोधात विरोधकांचा एकच उमेदवार रिंगणात असू शकतो. मात्र, इंडिया आघाडीतील काही राजकीय पक्ष हे राज्य पातळीवर एकमेकांच्या विरोधात आहेत. यामध्ये केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्यांमध्ये थेट असणार आहे. तर, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसविरोधात सध्या काँग्रेस-डाव्यांची आघाडी आहे. तर, दिल्ली आणि पंजाब सारख्या राज्यात काँग्रेस आणि आम आदमी पक्षात चढाओढ असणार आहे. त्यामुळे काँग्रेस आणि इतर पक्ष किती सामंजस्याने जागा वाटप होईल, यावरदेखील इंडिया आघाडीचे यश अवलंबून असणार आहे. 

नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत इंडिया आघाडी म्हणून उमेदवार देण्यात आला नाही. त्याचा फटका काही जागांवर काँग्रेसला बसला असल्याचे समोर आले आहे. इंडिया आघाडी म्हणून निवडणूक लढवली गेली असती आणि काँग्रेसने इतर पक्षांसाठी काही जागा सोडल्या असत्या तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला असता, असेही विश्लेषक सांगत आहेत. भाजपचा जोर असलेल्या हिंदी भाषिक पट्ट्यातील काही राज्यांमध्ये काँग्रेस कमकुवत आहे. लोकसभेच्या 80 जागा असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची अवघी एकच जागा आहे. तर, त्या ठिकाणी समाजवादी पक्ष मजबूत आहे. त्यामुळे कमकुवत असलेल्या राज्यांमध्ये जागा वाटप जुळून आल्यास हिंदी भाषिक पट्ट्यात भाजपला मागील लोकसभेची कामगिरीची पुनरावृत्ती करण्यास अधिक आव्हानात्मक असणार आहे. 

[ad_2]

Related posts