Telangana Politicis News Telangana Chief Minister Revanth Reddy Wife Is Richer Than Him

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Telangana News : तेलंगणाच्या राजकारणात (Telangana Politicis)  आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज तिथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले आहे. ABVP मधून आपल्या कारकिर्दीची सुरुवात करणाऱ्या रेवंत रेड्डी यांनी मुख्यमंत्री पदाची (Chief Minister Revanth Reddy) शपथ घेतली आहे. RSS मध्ये आल्यानंतर ते भाजपशीही जोडले गेले होते. पुन्हा त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. अशातच रेवंत रेड्डी यांनी विधानसभा निवडणुकीसाठी सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातून वेगळी माहिती समोर आली आहे. यामधील माहितीवरुन रेवंत रेड्डी यांच्यापेक्षी त्यांची पत्नी श्रीमंत आहे. 

रेवंत रेड्डी यांच्यापेक्षा त्यांची पत्नी श्रीमंत आहे. रेवंत रेड्डी यांचे प्रतिज्ञापत्रात याबाबतची माहिती सांगण्यात आली आहे. रेवंत रेड्डी त्यांच्या पत्नीच्या तुलनेत किती गरीब आहेत? याबाबतची माहिती पाहुयात. 

रेवंत रेड्डी यांच्या पत्नीकडे जंगम मालमत्ता किती ?

प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, रेवंत रेड्डी आणि त्यांच्या पत्नीकडे 5,17,21,350 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. 5,50,000 रुपये HUF रक्कम देखील समाविष्ट आहे. एकूण स्थावर मालमत्तेमध्ये रेवंत यांचा हिस्सा 2.19 कोटी रुपये आहे. तर त्यांची पत्नी गीता यांचा वाटा हा 2.92 कोटी रुपये आहे. याचा अर्थ जंगम मालमत्तेवर रेवंत रेड्डी नाही तर त्यांच्या पत्नीचे वर्चस्व आहे. ज्याअंतर्गत त्यांनी एलआयसीसह रिअल इस्टेट फर्ममध्येही गुंतवणूक केली आहे. त्यांची पत्नी गीता यांच्याकडे 83.36 लाख रुपयांचे सोन्याचे दागिने आहेत. तर त्यांच्याकडील चांदीची किंमत 7.17 लाख रुपये आहे. तर रेवंत रेड्डी यांनी कोणत्याही सरकारी किंवा शेअर बाजारात गुंतवणूक केलेली नाही. रेवंत रेड्डी यांच्याकडे होंडा सिटी आणि मर्सिडीज बेंझ या कार आहेत. त्यांच्याकडे एक पिस्तूलही आहे, ज्याची किंमत दोन लाख रुपये आहे.

दोघांच्याही नावावर 7.77 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची शेतजमीन

रेवंत रेड्डी आणि त्यांची पत्नी गीता यांच्याकडेही मोठ्या प्रमाणात स्थावर मालमत्ता आहे. व्यवसायाने शेतकरी असलेले रेवंत रेड्डी आणि त्यांच्या पत्नी गीता यांच्या नावावर 7.77 कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीची शेतजमीन आहे. त्यापैकी 1.07 कोटी रुपयांची जमीन HUF मार्फत प्राप्त झाली आहे. त्यांची पत्नी गीता यांच्याकडे सुमारे 1 कोटी रुपयांची शेतजमीन आहे. 10 कोटी रुपयांहून अधिक किंमतीची जमीन रेवंत रेड्डी यांच्याकडे आहे. बिगरशेती जमिनीबद्दल बोलायचे झाले तर इथे पत्नी गीता रेवंत रेड्डी यांना मागे टाकताना दिसते. एकूण 4.82 कोटी रुपयांच्या शेतजमिनीपैकी गीता यांच्याकडे 4.25 कोटी रुपयांच्या दोन जमिनी आहेत. तर रेवंत रेड्डी यांच्याकडे 53 लाख रुपयांपेक्षा जास्त किमतीची जमीन आहे. निवासी मालमत्तेच्या बाबतीतही गीता रेवंतपेक्षा वरचढ आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार, गीता यांच्याकडे दोन निवासी मालमत्ता आहेत. ज्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. तर रेवंत रेड्डी यांच्याकडेही दोन मालमत्ता आहेत, ज्यांची किंमत 2.50 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

तेलंगणाच्या मुख्यमंत्रीपदी रेवंत रेड्डी विराजमान; सोनिया गांधीसह काँग्रेस पक्षश्रेष्ठी शपथविधीसोहळ्याला उपस्थित

 

[ad_2]

Related posts