Raju Shetti Criticizes Central Government Over Ban On Ethanol Production

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raju shetti : केंद्र सरकारनं इथेनॉलच्या उत्पादनावर (ethanol production) घातलेली बंदी म्हणजे तुघलकी निर्णय आहे. हे आम्हाला कदापी मान्य नसल्याचे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Saghtana) नेते राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी केलं. देशात साखर कमी पडून साखरेचे दर वाढतील या भितीने केंद्रानं इथेनॉल निर्मितीवरील घातलेली बंदी तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली.

इथेनॉलमध्ये साखर कारखान्यांनी अब्जावधी रुपये  गुंतवले

केंद्र सरकारनं साखर उद्योगातील खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांना प्रोत्साहन , सबसिडी आणि व्याजामध्ये सवलत देऊन इथेनॉलचे प्रकल्प उभे करण्यास सांगितले आहे. साखर उद्योगाला चालना मिळावी यासाठी केंद्राने इथेनॉल निर्मितीला चालना दिली आहे. यामुळं कोट्यवधी रुपयांचे भाग भांडवल देशातील साखर उद्योगानं यामध्ये गुंतवले आहेत. अशातच अचानक केंद्र सरकारनं इथेनॉलच्या उत्पादनावर बंदी घातली आहे. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्यावर देखील होणार असल्याचे राजू शेट्टी म्हणाले. केंद्र सरकार ही  बंदी घालून शांत बसेल. मात्र, इथेनॉलमध्ये साखर कारखान्यांनी अब्जावधी रुपये  गुंतवले आहेत, त्याचे काय होणार आहे. याचे उत्तर केंद्र सरकारकडे नसल्याचे शेट्टी म्हणाले.

 उत्पादन खर्च वाढला, शेती करणं परवडेना

देशात यंदा साखरेचे उत्पादन कमी होणार आहे. त्याला केंद्र सरकारचे धोरण कारणीभूत आहे. पुढील वर्षीही साखरेची परिस्थिती याहून अधिक गंभीर परिणाम होणार आहे. देशातील ऊसाचे क्षेत्र कशामुळं कमी झाले आहे. याच्या मुळापर्यंत जाणे गरजेचे असल्याचे राजू शेट्टी म्हणाले.  रासायनिक खतांच्या किंमती प्रचंड वाढल्या आहेत. उत्पादन खर्च वाढलेला आहे.  शेतकऱ्यांना ऊसाची शेती परवडत नाही. देशात दुष्काळाचे सावट आहे. अशा परिस्थितीमध्ये देशातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना केंद्र सरकारने तातडीने आर्थिक सहाय्य करणे गरजेचे आहे. त्यांना ऊस लागवडीमध्ये प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. तरच देशातील उसाचे उत्पादन वाढून साखर उत्पादीत होणार आहे. केंद्राने घेतलेला हा विदुषकी निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे.

सरकारचा निर्णय काय?

सध्या देशात साखरेच्या दरात (Sugar Price) मोठी वाढ झाली आहे. कारण ऊसाच्या उत्पादनात घट झाल्याचा परिणाम दरांवर होत आहे. दरम्यान, याबाबत सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने जूनपासून ऊसापासून इथेनॉल निर्मितीवर (Ethanol Production) बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाबाबत अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. या निर्णयानंतर देशांतर्गत बाजारपेठेतील साखरेच्या वाढत्या किमतींवर नियंत्रण ठेवण्यास मदत होईल, असे मानले जात आहे. दरम्यान, भारत सरकार साखरेपासून इथेनॉल निर्मितीच्या उत्पादनावर बंदी घालू शकते अशा बातम्या येताच, आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत न्यूयॉर्क एक्सचेंजमध्ये साखरेचे भाव सुमारे 8 टक्क्यांनी घसरले आहेत. या निर्णयाचा परिणाम देशांतर्गत बाजारातही दिसून येईल, असे मानले जात आहे. साखरेचे भाव खाली येण्याची शक्यता आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

मोठी बातमी! साखरेपासून इथेनॉल निर्मिती करण्यावर बंदी, दर नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारचा निर्णय 

[ad_2]

Related posts