[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
DRDO Scientist Pradeep Kurulkar: देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला पाठवल्याप्रकरणी डीआरडीओचे अधिकारी डॉ. प्रदीप कुरुलकरांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर डॉ. प्रदीप कुरुलकरांनी आपल्या वकिलांमार्फत जामीनासाठी अर्ज केला होता. त्यानंतर कोर्टानं हा जामीन फेटाळला. डॉ. कुरुलकर यांनी पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती दाखविण्याची तयारी दर्शवली होती, असे त्यांच्या व्हॉटस्अप चॅटिंगमधून स्पष्ट झालं आहे.
डॉ. प्रदीप कुरुलकरचा जामीन अर्ज फेटाळला
देशाच्या विविध सुरक्षा विषयक प्रकल्पांची माहिती पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेराला पाठविल्याचा आरोपावरून डॉ. प्रदीप कुरुलकर सध्या येरवडा कारागृहात आहेत
डॉ. कुरुलकर याने अॅड. ऋषीकेश गानू यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता
कुरुलकर याने मोबाईलमधील काही डाटा डिलीट केला आहे. तसेच, जप्त करण्यात आलेला एक मोबाईल नादुरूस्त करण्यात आला असून फॉरेन्सिक तपासणीसाठी तो गुजरात येथे पाठविण्यात आला आहे. त्याचा अहवाल येणे बाकी आहे
डॉ. कुरुलकरने पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेतील हेर झारा दासगुप्ता हिला अत्यंत गोपनीय माहिती दाखविण्याची तयारी दर्शवली होती, असे त्यांच्या व्हॉटस्अप चॅटिंगमधून स्पष्ट
दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) या प्रकरणात न्यायालयात दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून हे चॅटिंग समोर.
[ad_2]