Mahua Moitra TMC MP Reaction After Expelled From Lok Sabha Said There Is No Evidence Against Me Also Blame To BJP Parliament Winter Session 2023 Detail Marathi News 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

नवी दिल्ली : माझ्या विरोधात कोणतेही पुरावे सापडले नाहीत, ही भाजपचीच खेळी असल्याचा आरोप करत तृणमूल काँग्रेसच्या (TMC) नेत्या महुआ मोईत्रा (Mahua Moitra) यांनी खासदारकी रद्द झाल्यावर पहिली प्रतिक्रिया दिलीय. मला गप्प करु नाही शकत असं म्हणत त्यांनी भाजपवर (BJP) हल्लाबोल केलाय.  यावेळी बोलताना महुआ मोईत्रा यांनी म्हटलं की, एथिक्स कमिटीच्या अहवालात माझे लोकसभेचे सदस्यत्व रद्द करण्याच्या शिफारशीमागील कारण म्हणजे लॉगिन आयडी शेअर करणे, पण याबाबत कोणताही नियम नाही.”

पुढे त्यांनी म्हटलं की,  मोदी सरकारला वाटले की मला गप्प करून अदानी समूहाच्या समस्येतून सुटका मिळेल. मी तुम्हाला सांगतो की या कांगारू कोर्टाने संपूर्ण भारताला दाखवून दिलेली घाई सांगते की अदानी ग्रुप तुमच्यासाठी किती महत्त्वपू्र्ण आहे. लोकसभेत केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी मोईत्रा यांच्या हकालपट्टीचा प्रस्ताव मांडला होती. त्यांच्या या प्रस्तावाला शुक्रवार 8 डिसेंबर रोजी लोकसभेत मंजूरी देण्यात आलीये.

भाजपवर हल्लाबोल 

मी लॉगिन पोर्टलद्वारे राष्ट्रीय सुरक्षेला धोका निर्माण केला आहे का, असा प्रश्न मोईत्रा यांनी विचारला. भाजप खासदार रमेश बिधुरी यांनी संसद भवनात दानिश अली यांना धार्मिक शब्द सुनावले. दानिश अली हे 26 मुस्लिम खासदारांपैकी एक आहेत.  या देशात 200 दशलक्ष मुस्लिम राहतात. भाजपचे 303 खासदार असून त्यांचा एकही खासदार मुस्लिम नाही, अशी प्रतिक्रिया महुआ मोईत्रा यांनी दिली. 

नेमकं प्रकरण काय?

भाजप खासदार विनोद कुमार सोनकर यांच्या अध्यक्षतेखालील आचार समितीने 9 नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत पैसे घेतल्याच्या आणि सभागृहात प्रश्न विचारल्याच्या आरोपावरून मोईत्रा यांची लोकसभेतून हकालपट्टी करण्याची शिफारस करणारा अहवाल स्वीकारला होता. ‘पैसे घेऊन प्रश्न’ विचारण्याच्या आरोपाबाबतच्या प्रकरणाची कालबद्ध चौकशी करण्याची शिफारस समितीने केली होती. र्शन हिरानंदानी यांच्या रोख व्यवहार प्रकरणाच्या चौकशीची शिफारस भारत सरकारला करण्यात आली होती.  या प्रकरणावर लोकसभेत जवळपास अर्ध्या तासाहून अधिक काळ चर्चा करण्याती आली. यावेळी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी महुआ मोईत्रा यांना देखील बोलण्याची संधी देण्यात आली. 

हेही वाचा :

Lok Sabha Expels Mahua Moitra: तृणमूल काँग्रेसला मोठा धक्का, महुआ मोईत्रा यांची खासदारकी रद्द



[ad_2]

Related posts