Onion Price News What Is The Price Of Onion In Pakistan  agriculture News Onion India Onion Export Ban  

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Onion Price in Pakistan : देशात कांद्याच्या दरात (Onion Price) वाढ होत आहे. प्रतिकिलो कांद्याचे दर हे 50 ते 60 रुपयांच्या आसपास आहेत. तर काही ठिकाणी कांद्याचे दर हे 70 ते 80 रुपये किलोच्या आसपास आहेत. दरम्यान, देशात कांद्याचे दर वाढले की आरडाओरड सुरु होते. सर्वसामान्यांचे बजेट कोसळल्याचं बोललं जातं. मात्र, तुम्हाला पाकिस्तानात (Pakistan) कांद्याला किती दर मिळतो हे माहिती आहे का? पाहुयात त्याबद्दल माहिती.

पाकिस्तानात प्रतिकिलो कांद्याला 130 ते 140 रुपयांचा दर 

कांद्याच्या दरात वाढ झाली की देशात आरडाओरड सुरु होते. भारतात सध्या 50 ते 60 रुपयांच्या आसपास कांद्याचे दर आहेत. पण इतर देशात बघितलं तर भारताच्या तिप्पट चौपट काद्यांचे दर आहेत. अमेरिकेत कांद्याचे दर हे प्रतिकिलोसाठी 240 ते 250 रुपयांपर्यंत आहे. तर आपला शेजारी असलेला देश पाकिस्तानमध्ये देखील कांद्याचे दर मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. पाकिस्तानात प्रतिकिलो कांद्यासाठी 130 ते 140 रुपयांचा दर आहे. तर पाकिस्तानातील काही शहरांमध्ये कांद्याचे दर हे 145 रुपयांच्या पुढे गेले आहेत.  

कांद्याच्या निर्यातीवर बंदी 

सध्या कांद्याच्या दरात सातत्यानं वाढ होत आहे. याचा शेतकऱ्यांना फायदा होत आहे. मात्र, कांद्याचे दर वाढल्यानं, सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत असल्याचे बोलले जात आहे. तसेच कांद्याचे दर वाढले की सर्वसामान्यांचे बजेट कोलमडल्याचे बोलले जाते. त्यामुळं कांद्याच्या किंमती नियंत्रीत ठेवण्यासाठी सरकार सातत्यानं प्रयत्न करत आहे. कांद्याचे वाढते दर कमी करण्यासाठी सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे, सरकारनं कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. अचानक घातलेल्या निर्याबंदीमुळं देशातील शेतकरी व्यापाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. केंद्र शासनाकडून 31 मार्च 2024 पर्यंत कांदा निर्यातीवर बंदी घालण्यात आली आहे. कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी केंद्र शासनाने निर्यात बंदीचा घेतला निर्णय घेतला आहे. सरकारच्या या निर्णयानंतर लासलगाव, मनमाड, नांदगावसह बहुतांश बाजार समित्यात कांद्याचे लिलाव बंद आहेत. नाशिकच्या उमराणे येथे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी मुंबई – आग्रा महामार्ग रोखला आहे. दिल्लीतील बाजारात स्थानिक विक्रेते 70 ते 80 रुपये किलो दरानं कांद्याची विक्री करत आहेत. मात्र, आता निर्यातबंदी केल्यानं दरात घसरण होण्याची शक्यता आहे

कांद्याची निर्यात बंदी शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी

भारताचा कांदा हा विविध देशांमध्य निर्यात केला जातो. भारतीय कांद्याला परदेशात मोठी मागणी देखील आहे. बांगलादेश, मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे तीन प्रमुख कांद्याचे आयातदार देश आहेत. मात्र, अचानक सरकारनं निर्यातबंदीचं हत्यार उपसलं आहे. याचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. दरम्यान, इथेनॉलनिर्मितीवर निर्बंध आणि कांद्याची निर्यात बंदी शेतकऱ्यांना उध्वस्त करणारी आहे. हा निर्णय केंद्र सरकारने तात्काळ मागे घ्यावा, अन्यथा मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांचा उद्रेक रस्त्यावरती दिसेल असा इशारा विविध संघटनांनी दिला आहे.

महत्त्वाच्या बातम्या:

कांद्यावर निर्यातबंदी! केंद्र सरकारचा मोठा निर्णय, बळीराजाला बसणार फटका

[ad_2]

Related posts