Weather Update Today IMD Predicts Heavy Rains Hailstorm In Several States For Coming Weekend Check Latest Forecast

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Update Today : देशात थंडीची (Cold Weather) प्रतीक्षा अद्याप कायम आहे. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, देशातील काही भागात पुढील चार ते पाच दिवसांत हलका ते मध्यम पाऊस स्वरुपाचा पडेल. केरळ, माहे, तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल आणि लक्षद्वीपमध्ये विजांचा कडकडाट आणि गडगडाटासह पावसाची शक्यता आहे. आज केरळ, तामिळनाडू आणि आज लक्षद्वीपमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. 12 डिसेंबरपर्यंत सिक्कीम, बंगालमध्ये भागात गारपीट होण्याची शक्यता आहे.

पुढील 24 तासांत पावसाची शक्यता

पुढील 24 तासांत नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, मेघालय आणि आसाम तसेच झारखंड, बिहार, उत्तर प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये पावसाची शक्यता आहे. या आठवड्याच्या सुरुवातीला मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Michaung) चेन्नईमध्ये जनजीवन अद्याप विस्कळीत आहे. 4 आणि 5 डिसेंबर रोजी चक्रीवादळामुळे मुसळधार पाऊस पडला, यामुळे शहरात पूर आला आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.

उत्तर भारतात गारठा वाढला

पर्वतीय भागांत बर्फवृष्टी झाल्यामुळे उत्तर भारतात थंडी वाढू लागली आहे. लोक उबदार कपडे घालूनच घराबाहेर पडत आहेत. राजधानी दिल्लीत तापमानात सातत्याने घट होत आहे. उत्तर प्रदेश, पंजाब आणि हरियाणामध्ये जोरदार वारे वाहत असल्याने हवेत गारठा जाणवू लागला आहे. हवामान खात्याने उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये हलक्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे.

[ad_2]

Related posts