mp girl raped forcibly in moving ac train near satna real railway station

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Rape In Train : धावत्या ट्रेनमध्ये मुलीवर बलात्काराची (Rape in Moving Train) संतापजनक घटना समोर आली आहे. ट्रेनच्या वातानुकूलित कोचमधून (AC Coach) एक तरुणी प्रवास करतो होती. आरोपीने या तरुणीला जबर मारहाण करत तिच्यावर बाथरुममध्ये बलात्कार केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी मध्य प्रदेशमधल्या (Madhya Pradesh) कटनी ते उचेहरादरम्यान धावणाऱ्या मेमू ट्रेनमधून पीडित तरुणी प्रवास करत होती. ट्रेन कटनीहून पुढच्या पकरिया रेल्वे स्थानकावर गेली. त्यावेळी ट्रेनच्या एसी कोचमध्ये बसलेली तरुणी बाथरुमसाठी गेली. त्याचवेळी पकरिया स्टेशनवर एक आरोपी तरुण ट्रेनमध्ये चढला आणि पीडित तरुणीला ढकलत बाथरुममध्ये शिरला. आरोीने बाथरुमचा दरवाजा बंद कर आधी तरुणीला जबर मारहाण केली. त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला. 

ट्रेन सताना स्टेशनवर पोहोचतात पीडित तरुणीने आरडाओरडा सुरु केला. त्यामुळे घाबरलेल्या आरोपीने तरुणीला बाथरुमच्या बाहेर ढकललं आणि स्वत:ला बाथरुममध्ये कैद करुन घेतलं. पीडित तरुणीने सतना रेल्वे स्थानकावर उतरत जीआरपी पोलिसांना सर्व प्रकार सांगितला. पण तोपर्यंत ट्रेन सतना रेल्वे स्थानकारुन निघाली होती. सतना पोलिसांनी तात्काळ सूत्र हलवत ट्रेन पुढच्या स्टेशनवर थांबवली. त्या स्टेशनवरच्या पोलीस आणि स्टेशन मास्तरांना याबाबतची माहिती देण्यात आली. ट्रेन कैमा रेल्वे स्थानकावर थांबताच पोलीस ट्रेनमध्ये शिरले.

आरोपीने स्वत:ला बाथरुममध्ये कैद करुन घेतलं होतं. पोलिसांनी बाथरुमचा दरवाजा उघडण्याचा आव्हान केलं. पण आरोपीने दरवाजा उघडला नाही. ट्रेनचा खोळंबा होत असल्याने ट्रेन सुरु करण्यात आली. पुढे रिवा रेल्वे स्थानाकवर ट्रेन दाखल होताच पोलिसांची आणखी कुमक मागवण्या आली आणि बाथरुमचा दरवाजा तोडण्यात आला. आरोपीला बाथरुमच्या बाहेर काढत अट करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीचं नाव पंकज कुशवाहा असं आहे. पोलिसांनी आरोपीवर मारहाण आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. 

सेक्सटॉर्शन करणारी गँग अटकेत
दरम्यान दुसऱ्या एका घटनेत झारखंड पोलिसांनी सेक्सटॉर्शन करणाऱ्या गँगचा भांडाफोड केला आहे. अटक टाळण्यासाठी आरोपींनी नदीत उडी मारली. पण पोलिसांनी नदीत उतरत सर्व आरोपींना अटक केली. पोलिासांनी आरोपींकडून 8.30 लाख रुपयांची रोकड, 12 फोन, 18 सिम कार्ड, 21 एटीएम कार्ड, 12 पासबूक, 6 चेकबूक, 4 पॅनकार्ड आणि 2 आधारकार्ड जप्त केलेत. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी ओकलुट लोकांटो आणि स्कोका अॅपच्या माध्यमातून लोकांना न्यूड व्हिडिओ कॉल करत असत त्यानंतर त्याचा स्क्रिनशॉट घेऊन त व्हायरल करण्याची धमकी देत लोकांकडून लाखो रुपये उकळत होते. याशिवाय गर्भवती महिलांच्या मोबाईलवर फोन करत मातृत्व लाभाचे पैसे देण्याचं आमिष दाखवत त्यांची फसवणूक केली जात होती. 

Related posts