Indian Share Market To Be 7 Th Big Stock Market In World Hong Kong Hang Seng Bse Nse Marathi News Update 

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई: भारतीय अर्थव्यवस्था सातत्याने नवीन उंची गाठत आहे. भारताची आर्थिक वाढ जगातील इतर अर्थव्यवस्थांच्या तुलनेत खूपच चांगली आहे. 2027 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याची शक्यता आहे. म्हणजेच ती जपानला मागे टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आ आधी भारतीय अर्थव्यवस्थेने ब्रिटनला मागे टाकून जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनण्याचा मान मिळवला आहे. लवकरच त्याचा परिणाम भारतीय शेअर बाजारात दिसून येईल आणि शेअर बाजारही  (Indian Share Market) नवा विक्रम करण्याच्या तयारीत असल्याचं चित्र आहे. 

येत्या काही दिवसात भारतीय शेअर बाजार हा हाँगकाँगच्या शेअर बाजाराला (Hong Kong Share Market Hang Seng) मागे टाकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. एकूण मार्केट कॅपिटलचा विचार करता भारतीय शेअर बाजार येत्या काळात जगातील सातव्या क्रमांकावर पोहोचण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

भारतीय शेअर बाजार किती मोठा आहे? (Indian Share Market Capitalisation) 

भारताच्या शेअर बाजारात सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजार भांडवल ऑक्टोबरच्या अखेरीस 3700 अब्ज डॉलर्सवर पोहोचले आहे. त्याच वेळी हाँगकाँगच्या शेअर बाजाराचे बाजार भांडवल हे 3900 अब्ज डॉलर्स इतके होते. म्हणजेच दोन्ही शेअर बाजारांमध्ये फारसा फरक नाही आणि त्यामुळेच येत्या काळात भारतीय शेअर बाजार हा हाँगकाँगच्या बाजाराला मागे टाकेल असा दावा वर्ल्ड फेडरेशन ऑफ एक्सचेंजेसने केला आहे.

नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये भारतातील शेअर बाजारात मोठी तेजी दिसून आल्याने गुंतवणूकदारांचा मोठा फायदा झाला. तीन राज्यात भाजपला बहुमत मिळाल्यानंतर गुंतवणूकदारांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याच वेळी देशाचे आर्थिक निर्देशक देखील स्थिर आहेत.

जगातील 7 वा सर्वात मोठा शेअर बाजार 

भारताचा शेअर बाजार जगातील सातव्या क्रमांकाचा शेअर बाजार बनणार आहे. म्हणजे मग त्याच्या आधी फक्त न्यूयॉर्क स्टॉक एक्सचेंज, नॅस्डॅक, शांघाय, युरोनेक्स्ट, जपान आणि शेन्झेनचे शेअर बाजार आहेत. फक्त 2023 सालचा विचार करता भारताच्या बीएसई सेन्सेक्सने 14 टक्के वाढ नोंदवली आहे आणि एनएसईच्या निफ्टी 50 ने 15 टक्के वाढ नोंदवली आहे. त्याचवेळी हाँगकाँगचा हँगशेंग निर्देशांक 17 टक्क्यांनी घसरला आहे.

ही बातमी वाचा: 

[ad_2]

Related posts