( प्रगत भारत । pragatbharat.com)
UP Crime : देशभरात गेल्या काही दिवसांपासून लव्ह जिहादच्या (Love Jihad) अनेक घटना समोर येत आहे. द केरला स्टोरी (the kerala story) या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर असे प्रकार समोर येण्याच्या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेक अल्पवयीन मुलींना प्रेमाची फूस लावून त्यांचे जबरदस्तीने धर्मांतरण घडवण्यात आल्याचा प्रकार अनेक प्रकरणांमध्ये उघड झाला आहे. अशातच लव्ह जिहादचा कडक कायदा उत्तर प्रदेशात लागू असतानाही एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लव्ह जिहादसाठी तब्बल 10 वर्षांची शिक्षा असतानाही उत्तर प्रदेशात (UP News) हादरवणारी घटना समोर आली आहे.
उत्तर प्रदेशातील प्रयागराज येथे लव्ह जिहादचे प्रकरण ऐकून सर्वांनाच धक्का बसला आहे. प्रयागराजच्या शिवकुटी पोलीस ठाण्यामध्ये तैनात असलेल्या एका महिला पोलीस हवालदाराने तिच्याच विभागात तैनात असलेल्या पोलीस हवालदार इम्रान खानवर लग्नाच्या नावाखाली लव्ह जिहाद केल्याचा आरोप केला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर शिवकुटी पोलीस ठाण्यात एकच खळबळ उडाली आहे. या सर्व प्रकारानंतर दोघांच्याही सहकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेने इम्रान खानवर बौद्ध धर्म स्वीकारून फसवणूक करून लग्न केल्याचा आरोप केला आहे. इम्रान खानने बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर माझ्याशी लग्न केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. लग्नानंतर आरोपी इम्रान खान महिलेवर मुस्लिम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव टाकत आहे, असाही आरोप पीडित महिला हवालदाराने केला आहे. ही बाब समोर आल्यानंतर पोलीस विभागात खळबळ उडाली आहे.
तक्रारदार महिलेनेआरोपी इम्रान खानचे वडील मुलतान आणि भाऊ मोहसिन खान यांच्यावरही गंभीर आरोप लावले आहेत. इम्रान खानने त्याच्या संपूर्ण कुटुंबासह लग्नाच्या नावाखाली माझ्यासोबत लव्ह जिहाद केल्याचे पीडितेने म्हटलं आहे. पीडितेच्या तक्रारीवरून, आरोपी इम्रानविरुद्ध 23 फेब्रुवारी 2023 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र या प्रकरणाचे तपास करणारे पोलीस अधिकाऱ्यांनी इम्नान खानसोबत हातमिळवणी केल्याचा आरोप पीडितेने केला आहे. इतकंच नाही तर तपासकर्त्यांनी इम्रानच्या भावाची आणि वडिलांची नावेही या प्रकरणातून काढून टाकली आहेत. आरोपीवर कारवाई होत नसल्याने पीडितेने शुक्रवारी संध्याकाळी शिवकुटी पोलीस ठाण्यात गोंधळ घातल्यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला.
प्रशिक्षणादरम्यान प्रेम जुळलं अन्…
पीडित महिला शिवकुटी पोलीस ठाण्यात तैनात असून ती मूळची वाराणसीची आहे. महिला कॉन्स्टेबलचा आरोप आहे की तिचा पती इम्रान खान देखील उत्तर प्रदेश पोलिसात हवालदार म्हणून तैनात आहे आणि तो तिचा वरिष्ठ आहे. प्रशिक्षणादरम्यान तो तिच्या संपर्कात आला आणि प्रेमात पडला. पीडितेने दिलेल्या माहितीनुसार, लग्नानंतर इम्रानने मुलीला सांगितले की, तो बौद्ध धर्म स्वीकारून तिच्यासोबत राहणार आहे. आरोपीने आपले नावही बदलून अशोक ठेवले, मात्र तो काही दिवसांनी परतला. त्याने इस्लाम धर्म स्वीकारला आणि लग्नानंतर त्याने माझ्यावर इस्लाम धर्म स्वीकारण्यासाठी दबाव आणण्यास सुरुवात केली. 2018 मध्ये इम्रान खानने बौद्ध धर्म स्वीकारला आणि वाराणसीमध्ये तिच्याशी लग्न केले. लग्नानंतर महिलेचा छळ सुरू झाला. जर तुला त्याच्यासोबत राहायचे असेल तर मुस्लिम धर्म स्वीकारावा लागेल, अशी धमकी आरोपी इम्रान खानने दिली.
दीराने केला अत्याचार
पीडितेच्या म्हणण्यानुसार, 2019 मध्ये ती इम्रानच्या घरी एका कार्यक्रमाला गेली होती. तेव्हा तिथे रात्री इम्रानचा भाऊ मोहसीनने तिच्यावर बलात्कार केला. पीडितेला चार वर्षांचे मूल आहे. 2019 मध्येच इम्रानने मुलाची खतना करण्याचा प्रयत्न केला, पण जेव्हा तिला याची माहिती मिळाली तेव्हा तिने याचा विरोध केला