[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
IT Department Raids On Dheeraj Sahu: काँग्रेसचे (Congress) राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू (Rajya Sabha MP Dheeraj Prasad Sahu) यांच्या घरातून आयकर विभागानं 351 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. देशाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी छापेमारी असल्याचं सांगितलं जात आहे. तब्बल सात दिवस सुरू असलेल्या या छापेमारीत आयकर विभागानं बक्कळ रोकड जप्त केली. साहू यांच्या घराच्या कानाकोपऱ्यात 500 आणि 200 रुपयांच्या नोटांची इतकी बंडल सापडली की, आयकर विभागालाही धक्का बसला. नोटा मोजण्यासाठी आयकर विभागाला वेगळी यंत्रणा बोलवाली लागली. रोख रक्कम इतकी होती की, नोटा मोजण्याच्या मशीन थकल्या आणि बंद पडल्या. आयकर विभागाच्या व्यतिरिक्त काही बँक कर्मचाऱ्यांनाही नोटा मोजण्यासाठी बोलावण्यात आलं होतं. पण आता अनेकांच्या मनात प्रश्न उपस्थित होतोय की, धीरज प्रसाद साहू यांच्या घरातून जप्त केलेल्या एवढ्या मोठ्या रोख रकमेचं आयकर विभाग करणार काय?
आयकर विभागाच्या (IT Department) पथकानं धीरज साहू यांच्या घरावर आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या मालमत्तांवर 6 डिसेंबर रोजी एकाच वेळी छापे टाकले. साहू यांच्या घरात तब्बल पाच दिवस शोधमोहीम सुरू होती. आयकर विभागाच्या धाडीत साहू यांच्या घरातून बेहिशेबी मालमत्ता उघडकीस आणली. साहू यांच्या घराच्या कानाकोपऱ्यातून तब्बल 351 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली. आयकर विभागानं एकूण 176 बॅगांपैकी 140 बॅगांची मोजणी पूर्ण केली. आतापर्यंतची सर्वात मोठी आयकर विभागाची छापेमारी असून आतापर्यंत जप्त करण्यात आलेला सर्वाधिक काळा पैसा असल्याचं आयकर विभागाचं म्हणणं आहे.
मद्यविक्रीशी (Liqour) संबंधित व्यवसायात टॅक्सचोरी होत असल्याच्या संशयामुळे आयकर विभागानं ही छापेमारी केली होती. टॅक्सचोरीच्या आरोपाखाली दारू व्यवसायात गुंतलेल्या एका कंपनीच्या जागेवर आयकर विभागानं छापेमारी केली. यामध्ये बुद्धिस्ट डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड, बलदेव साहू इन्फ्रा लिमिटेड, क्वालिटी बॉटलर्स आणि किशोर प्रसाद-विजय प्रसाद बेव्हरेज लिमिटेड या कंपन्यांच्या नावांचा समावेश आहे. झारखंडमधील रांची आणि लोहरदगा व्यतिरिक्त ओडिशातील बालंगीर, संबलपूर, रायडीह भागांत छापे टाकण्यात आले आहेत.
खासदार धीरज साहू यांचं कुटुंब काय करतं?
आयकर विभागानं ज्या बौद्ध डिस्टलरी कंपनीवर छापेमारी केलेली, त्या कंपनीची मालकी राज्यसभा खासदार धीरज साहू यांच्या कुटुंबाकडे आहे. ही कंपनी मद्य व्यवसायात आहे आणि ओदिशामध्ये त्यांचे अनेक मद्यनिर्मितीचे कारखाने आहेत. याच कंपनीच्या व्यवहारांच्या टॅक्स चोरीच्या आरोपांखाली कंपनीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकण्यात आले आहेत. 2009 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीत धीरज साहू पहिल्यांदाच राज्यसभेचे खासदार बनले होते. त्यानंतर ते 2010 मध्ये दुसऱ्यांदा आणि 2018 मध्ये तिसऱ्यांदा राज्यसभेवर पोहोचले.
आयकर विभागाचे नियम काय सांगतात?
आजतकनं दिलेल्या वृत्तानुसार, आयकर नियमांचे तज्ज्ञ सौरव कुमार यांनी सांगितलं की, धीरज साहू यांच्या घरातून जी संपत्ती जप्त करण्यात आली. त्यामुळे आगामी काळात करचुकवेगिरीचा तपास अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आयकर नियमांनुसार, अघोषित उत्पन्न आढळल्यास करासह दंडाची तरतूद आहे. मात्र, यासर्व गोष्टी टॅक्स स्लॅबवर अवलंबून आहेत. अशावेळी या संपत्तीवर 300 टक्क्यांपर्यंत टॅक्स आणि दंड आकारला जाऊ शकतो. नियमांनुसार, धीरज साहूंच्या घरातून जप्त करण्यात आलेली नोटांची बंडलं आणि इतर वस्तू त्यांना परत मिळणं अवघड आहे. त्यासोबतच त्यांना आणखी टॅक्सही द्यावा लागणार आहे.
अघोषित मालमत्तेच्या बाबतीत, आयकर विभागाकडून जास्तीत जास्त 33 टक्के कर आकारला जातो, ज्यावर 3 टक्के अधिभार आहे. यानंतर 200 टक्क्यांपर्यंत दंड आकारला जाऊ शकतो. नियमांनुसार, जप्त केलेली मालमत्ता चालू वित्तात घेतली असेल, तर त्यावर एकूण 84 टक्के कर आणि दंड वसूल केला जाईल. पण जर हा काळा पैसा गेल्याच वर्षाचा असेल तर त्यावर 99 टक्क्यांपर्यंत कर आणि दंड वसूल केला जाऊ शकतो.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
IT Raid on Dhiraj Prasad Sahu: 3 बँकांचे कर्मचारी अन् 40 मशिन्सही थकल्या; धीरज साहूंच्या घरी सापडलेल्या नोटा मोजता मोजता आयकर विभागाच्या नाकी नऊ
[ad_2]