PM Modi Slams Congress On IT Department Raid Dheeraj Prasad Sahu Money Heist

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

IT Department Raids On Dheeraj Sahu: काँग्रेसचे (Congress) राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू (Rajya Sabha MP Dheeraj Prasad Sahu) यांच्या घरातून आयकर विभागानं 351 कोटी रुपयांची रोकड जप्त केली आहे. देशाच्या इतिहासातील आतापर्यंतची सर्वात मोठी छापेमारी असल्याचं सांगितलं जात आहे. तब्बल सात दिवस सुरू असलेल्या या छापेमारीत आयकर विभागानं बक्कळ रोकड जप्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM Modi)  ट्विटच्या माध्यमातून काँग्रेस पक्षावर टीका केली आहे.  ओडिशाचे खासदार धीरज साहू यांच्या घरी सापडलेल्या घबाडचा व्हिडीओ टाकत गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेसची देशात लूटपाट सुरूच आहे, अशी टीका पंतप्रधानांनी केली आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी धीरज साहू यांच्या घरी सापडलेल्या घबाडचा व्हिडीओ  मनी हाईस्टचा उल्लेख करत  टाकला आहे. मोदी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाले, भारतामध्ये काँग्रेस पक्ष असताना वेगळ्या मनी हाईस्टची गरज कुणाला आहे. गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेसची देशात लूटपाट सुरूच आहे.

काँग्रेसच्या धनकुबेराचा खजिना उघड झाला आहे. नोटा मोजायला यंत्र कमी पडली. आयकर खात्याच्या छाप्यात नोटांची कपाटं दिसली आहे. काँग्रेसचे राज्यसभा खासदार धीरज प्रसाद साहू यांच्यावर आयकर विभागाने छापे टाकले. त्यात तब्बल 351 कोटींहून अधिक रक्कम जप्त करण्यात आली. ही छापेमारी तीन दिवस सुरू होती. साहूंच्या ओडीशा आणि झारखंडमधील विविध घरांवर झालेल्या कारवाईत हा कुबेराचा खजिनाच खुला झाला.बुधवारपासून हे छापे सुरू सुरू झाले. शुक्रवारपर्यंत छापे आणि जप्त केलेल्या नोटा यांची गणती सुरूच होती. नोटा मोजण्यासाठी तब्बल तीन डझन यंत्र मागवली गेली मात्र ही यंत्र कमी पडली.

भाजप प्रवक्त्यांचा गांधी घराण्यावर हल्लाबोल

ओडीशातल्या बौध डिस्टिलरी प्रायव्हेट लिमिटेड  या कारखान्यावर आयकर विभागाने छापे टाकले. या कंपनीचा थेट संबंध खासदार धीरज साहूंबरोबर आहे.  याशिवाय बलदेव साहू इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्याही  कार्यालयांवर छापे टाकण्यात आले. ओडिशातल्या संबलपूर, बोलांगीर, टिटिलागढ, बौध, सुंदरगड, राऊरकेला, भुवनेश्वर या ठिकाणी छापे मारले. तर झारखंडमध्ये रांची आणि बोकारोमध्येही कारवाई झाली. एकीकडे भाजप प्रवक्ते गांधी घराण्यावर हल्लाबोल करत असताना राज्यातल्या भाजप नेत्यांनी 
या धनसंपत्तीवरून  सवाल विचारले.

हे ही वाचा :

IT Department Raid: घरात सापडलेली बेहिशोबी मालमत्ता खासदार साहूंना परत मिळणार? आयकर विभाग जप्त केलेल्या 351 कोटींचं काय करणार?



[ad_2]

Related posts