[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Mukhtar Ansari Life Imprisonment: गँगसटर मुख्तार अन्सारीला (Mukhtar Ansari) वाराणसीने एमपी-एमएलए कोर्टाने (MP-MLA Court) 32 वर्षानंतर जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. गँगस्टर मुख्तार अन्सारीला अवधेश राय हत्याकांड प्रकरणी कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. तसेच एक लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
अवधेश राय हत्याकांड प्रकरणी वारणसीच्या एमपी एमएलए कोर्टाने सोमवारी दोषी ठरवले. त्यानंतर लंच ब्रेकनंतर मुख्य निकाल दिला आहे. कोर्टाने हत्याकांडातील दोषी मुख्तार अन्सारी जन्मठेप सुनावली आहे. आयपीसीच्या कलम 302 अंतर्गत मुख्तार अन्सारी यांना मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
Jailed gangster Mukhtar Ansari gets life imprisonment in Awadhesh Rai murder case
Read @ANI Story | https://t.co/RD7ILylfBM#MukhtarAnsari #AwadheshRai #Varanasi pic.twitter.com/NStD9hq8o8
Reels
— ANI Digital (@ani_digital) June 5, 2023
गेल्या वर्षभरात मुख्तार अन्सारीला वेगवेगळ्या चार प्रकरणात शिक्षा सुनावण्यात आली आहे. परंतु अवधेश राय हत्याकांड प्रकरणी मुख्तार अन्सारीला सर्वात मोठी शिक्षा मिळाली आहे. आजीवन कारावासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. या हत्येप्रकरणी दोन साक्षीदारांनी कोर्टात आपली साक्ष नोंदवली. शिक्षा सुनावल्यानंतर अन्सारीने वयाचा विचार करता शिक्षा कमी करण्याची मागणी केली. अवधेश राय हत्याकांड प्रकरणी कोर्टाने गँगस्टर मुख्तार अन्सारीला दोषी ठरवत तब्बल 32 वर्षांनी शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणात मुख्तार अन्सारीसह पाच जण आरोपी आहेत. मुख्तार अन्सारी, भीम सिंह, कमलेश सिंह, राकेश माजी आमदार अब्दुल कलाम अशी आरोपींची नावे आहेत. दरम्यान या पाच आरोपींपैकी अब्दुल आणि कमलेश यांचा मृत्यू झाला आहे.
काय आहे प्रकरण?
अवधेश राय ( Awadhesh Rai murder case) यांची 3 ऑगस्ट 1991 साली करण्यात आली होती. अवधेश राय आपला छोटा भाऊ काँग्रेस नेते अजय राय यांच्या घराबाहेर उभे होते. अचानक एक व्हॅन आली. व्हॅनमधील लोक खाली उतरले आणि त्यांनी गोळीबार केला. काँग्रेस नेते अवधेश राय यांची हत्या वारणसीच्या चेतगंज पोलिस ठाण्याच्या परिसरात झाली. ज्यादिवशी हत्या करण्यात आली त्यादिवशी पाऊस होता. व्हॅनमधून आलेल्या लोकांनी अवधेश राय यांच्यावर गोळ्या झाडल्या. त्यानंतर त्यांना उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
हे ही वाचा :
Mukhtar Ansari Convicted: मुख्तार अंसारीला दहा वर्षांची शिक्षा..गाजीपूरच्या MP-MLA कोर्टाचा निकाल..
माफिया मुख्तार अन्सारीचा भाऊ अफजल अन्सारींचं लोकसभा सदस्यत्व रद्द; न्यायालयानं सुनावली होती 4 वर्षांची शिक्षा
[ad_2]