[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Milk Price : सध्या दूध उत्पादक शेतकरी संकटात सापडला आहे. कारण, दुधाच्या दरात (Milk Price) मोठी घसरण झाली आहे. त्यामुळं दूध उत्पादक शेतकऱ्यांसह (Farmers) विविध शेतकरी संघटना आक्रमक झाल्या आहेत. अनेक ठिकाणी आंदोलने देखील सुरु आहेत. दरम्यान, दूध दराच्या मुद्यावरुन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath shinde) यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळाची महत्वाची बैठक होणार आहे. या बैठकीला रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांच्यासह दूध महासंघाचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत.
दूध दराच्या प्रश्नावरुन राज्यातील वातावरण चांगलच गरम झालं आहे. कारण सातत्यानं दुधाचे दर कमी होत आहेत. या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मंत्रीमंडळाची बैठक होत आहे. दुपारी चार वाजता ही बैठक होणार असल्याची माहिती रयत क्रांती संघटनेचे प्रमुख सदाभाऊ खोत यांनी दिली आहे. या बैठकीला दूध महासंघाचे प्रतिनिधी देखील उपस्थित राहणार आहेत. शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपयांचे अनुदान मिळावं ही प्रमुख मागणी देखील खोत यांनी केली आहे .
दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या नेमक्या मागण्या काय?
- राज्य सरकारनं दुधाच्या बुकटीला अनुदान द्यावं
- दुधाचे दर पडल्यामुळं दूध उत्पादकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्यामुळं दूध दराची निश्चिती करावी
- शेतकऱ्यांना प्रति लिटर पाच रुपये अनुदान मिळावं जेणेकरुन जो तोटा सहन करावा लागतोय तो दूध उत्पादकांना करावा लागणार नाही
आजच्या बैठकीत या प्रमुख तीन मागण्या करण्यात येणार असल्याची माहिती सदाभाऊ खोत यांनी दिली आहे.
दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा
दुधाला किमान 34 रुपये दर द्यावा या मागणीसाठी विविध ठिकाणी शेतकऱ्यांनी आंदोलने केली आहेत. तसेच अनेक ठिकाणी दुध ओतून देखील आंदोलने सुरु आहेत. राज्यभर दुधाचे भाव कोसळल्यामुळे आणि पशुखाद्याचे भाव सातत्याने वाढत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. शेतकऱ्यांना अशा अडचणीच्या काळात मदत व्हावी यासाठी सरकारने हस्तक्षेप करावा ही रास्त अपेक्षा बाळगून शेतकऱ्यांनी राज्यभर तीव्र आंदोलने केली. आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर सरकारने दुधाला किमान 34 रुपये भाव द्यावा असा शासनादेश काढला. मात्र सरकारचा हा शासनादेश खासगी आणि सहकारी दूध संघांनी धुडकावून लावला आहे. सरकारने या पार्श्वभूमीवर तातडीने कारवाई करावी आणि शेतकऱ्यांना दिलासा द्यावा अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली आहे. दरम्यान, आजच्या बैठकीत दूध दराच्या प्रश्नावर तोडगा निघणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
… तर मंत्रालयात दूध ओतू, दूध दराच्या प्रश्नावरुन किसान सभेचा इशारा; संगमनेरमध्ये दूध ओतून केल तीव्र आंदोलन
[ad_2]