मोठी बातमी : लोकसभेत सुरक्षेत मोठी चूक, अज्ञाताची प्रेक्षक गॅलरीतून उडी, स्मोक कँडल जाळल्या

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Parliament Winter Session 2023: नवी दिल्ली : संसदेचं हिवाळी अधिवेशन (Parliament Winter Session 2023) सुरु असताना, सुरक्षेत मोठी चूक (Security Breach) झाल्याचं समोर आलं आहे. कारण प्रेक्षत गॅलरीत (Audience Gallery) बसलेल्या एकाने खाली उडी मारली. भर लोकसभेत (Lok Sabha) हा प्रकार घडल्याने काहीसा गोंधळ उडाला. तीन जण प्रेक्षक गॅलरीत बसले होते. त्यापैकी एकाने गॅलरीतून खाली उडी मारली. या तिघांकडे स्प्रे असल्याची माहिती मिळत आहे. स्प्रे आणि काही धूरसदृश्य वस्तूही आढळली.  लोकसभेतील या प्रकारामुळे पुन्हा एकदा सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झालं आहे. 

दोन लोक खाली पडले. त्यानंतर अचानक धूर सुरु झाला. या दोघांना पकडण्यात आलं.या प्रकारानंतर लोकसभेचं कामकाज थांबवण्यात आलं आहे, अशी माहिती एका खासदाराने दिली.

लोकसभेत नेमकं काय घडलं?

संसदेचं हिवाळी अधिवेशन सध्या सुरु आहे. नेहमीप्रमाणे लोकसभेचं कामकाज सुरु होते. प्रेक्षक गॅलरीतून काही लोक कामकाज पाहात होते. अधिवेशन काळात संसदेला भेट देणाऱ्यांची संख्या मोठी असते. त्यामुळे नेहमीप्रमाणे गॅलरीत प्रेक्षकांची गर्दी होती. या गर्दीत तीन जण होते, त्यातील दोघांनी गॅलरीतून खाली जिथे सर्व खासदार बसून कामकाज करत असतात, तिथे उडी मारली. त्यांच्याकडे अश्रूधूर सदृश्य वस्तू होती. 

लक्ष वेधण्यासाठी स्मोक कँडल 

दरम्यान, ज्या व्यक्तींनी गॅलरीतून उडी मारली त्यापैकी एकाचं नाव सागर असल्याचं समजतं. तो कर्नाटकातील म्हैसूरच्या खासदाराच्या ओळखीने आल्याची माहिती मिळत आहे. या व्यक्तीने आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी स्मोक कँडल पेटवले.



[ad_2]

Related posts