Big Update From Railways Before Christmas 12 Trains Will Be Canceled On This Route

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Railways cancelled : ख्रिसमसपूर्वीच (Christmas) रेल्वे विभागाकडू (Railway Department) मोठी माहिती देण्यात आली आहे. ख्रिसमसच्या सुट्टीत जर तुम्ही गावी किंवा फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. भारतीय रेल्वेने 12 रेल्वे गाड्या रद्द केल्या आहेत. रेल्वे तिकीट बुक करण्यापूर्वी जाणून घ्या रेल्वेने कोणत्या गाड्या रद्द केल्या आहेत.

प्रवाशांना कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून तुमच्यासाठी ही बातमी महत्त्वाची आहे. रतलाम विभागाच्या रतलाम डाउन यार्ड ए केबिनशी प्लॅटफॉर्म 7 जोडला जात आहे. त्यामुळं हा मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळं अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक गाड्यांचे मार्गही वळवण्यात आले आहेत.

या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत

ट्रेन क्रमांक 19820 कोटा वडोदरा एक्सप्रेस 19 ते 25 डिसेंबर आणि ट्रेन क्रमांक 19819 वडोदरा कोटा एक्सप्रेस 20 ते 26 डिसेंबर या कालावधीत रद्द करण्यात आली आहे.

20 ते 25 डिसेंबरपर्यंत रतलाम ते कोटा ट्रेन क्रमांक 19104 आणि कोटा ते रतलाम ट्रेन रद्द करण्यात आली आहे.

ट्रेन क्रमांक 09546 नागदा रतलाम पॅसेंजर आणि ट्रेन क्रमांक 09545 रतलाम नागदा पॅसेंजर 20 डिसेंबर ते 25 डिसेंबर 2023 या कालावधीत रद्द करण्यात आल्या आहेत.

ट्रेन क्रमांक 09358 रतलाम दाहोद पॅसेंजर आणि दाहोदहून रतलामकडे जाणारी ट्रेन क्रमांक 09357 देखील रद्द राहतील.

ट्रेन क्रमांक 20936 आणि 20935 सुपरफास्ट एक्स्प्रेस इंदूर ते गांधीधाम आणि गांधीधाम ते इंदूर 24 आणि 25 डिसेंबर रोजी रद्द राहतील.

इंदूरहून 19 डिसेंबर रोजी धावणारी ट्रेन क्रमांक 19320 इंदूर बेराबल एक्स्प्रेस रद्द करण्यात आली आहे.

20 डिसेंबर रोजी बेराबल येथून धावणारी ट्रेन क्रमांक 19319 देखील रद्द करण्यात आली आहे.

गाडी क्रमांक 19340 भोपाळ दाहोद एक्स्प्रेस नागदा पर्यंत धावेल आणि नागदा ते दाहोद दरम्यान 19 ते 25 डिसेंबर दरम्यान रद्द राहील.

20 ते 25 डिसेंबर दरम्यान दाहोदहून धावणारी ट्रेन क्रमांक 19339 नागदा येथून धावेल आणि दाहोद ते नागदा दरम्यान रद्द राहील.

या गाड्यांचे मार्ग वळवण्यात आले आहेत

18 डिसेंबर 2023 रोजी ट्रेन क्रमांक 19667 उदयपूर सिटी म्हैसूर साप्ताहिक एक्सप्रेस वळवण्यात आली आहे. उदयपूरहून धावणारी ट्रेन हिम्मतनगर-असरवा-अहमदाबाद-वडोदरा मार्गे जाईल.

उदयपूर सिटी म्हैसूर एक्स्प्रेस 19668 वडोदरा-अहमदाबाद-असर्वा-हिम्मतनगर मार्गे धावेल.

उदयपूर सिटी वांद्रे टर्मिनस ट्राय वीकली एक्सप्रेस ट्रेन 22901 वांद्रे टर्मिनसवरून 19, 21 आणि 23 डिसेंबर रोजी अहमदाबाद-उसखवा-हिम्मतनगर मार्गे वडोदरा येथे पोहोचेल.

20, 22 आणि 24 डिसेंबर रोजी उदयपूर सिटी वांद्रे टर्मिनस ट्राय वीकली एक्सप्रेस डाउन ट्रेन क्रमांक 22902 उदयपूर शहर-हिम्मतनगर-असरवा-अहमदाबाद मार्गे धावेल.

अजमेर वांद्रे टर्मिनस एक्स्प्रेस ट्राय वीकली डाउन ट्रेन क्रमांक 12995 चा मार्गही 19  आणि 23 डिसेंबर रोजी बदलण्यात आला आहे. आता ही ट्रेन अजमेरमार्गे वडोदरा गाठेल.

21 डिसेंबर रोजी यशवंतहून जयपूरला जाणाऱ्या ट्रेन क्रमांक 82653 चा मार्गही वळवण्यात आला आहे. ही ट्रेन वडोदरा-अहमदाबाद-पालनपूर-अजमेर मार्गे धावेल.

23 डिसेंबर रोजी जयपूरहून धावणारी ट्रेन क्रमांक 82654 जयपूर आणि यशवंत साप्ताहिक एक्स्प्रेस अजमेर-पनालपूर-अहमदाबाद-वडोदरा मार्गे धावतील.

महत्त्वाच्या बातम्या:

देशाचं चित्र बदलणार! 1337 किमीचा रेल्वे कॉरिडॉर अर्थव्यवस्थेला देणार नवसंजीवनी

[ad_2]

Related posts