Raghuram Rajan News Former Governor RBI Raghuram Rajan Comment Indian Economy Marathi News Gdp

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raghuram Rajan : भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) झपाट्याने वाढत आहे. 5 ट्रिलियन रुपयांचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी मोदी सरकार (Modi Govt) सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. अशा स्थितीत आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केलेलं वक्तव्य चिंतेचा विषय आहे. रघुराम राजन (Raghuram Rajan) भारतीय अर्थव्यवस्था चमत्कारांवर अवलंबून आहे असे का म्हणाले? 

 2025 पर्यंत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य अशक्य 

पायाभूत सुविधांवरील खर्च आणि जगातील प्रमुख अर्थव्यवस्थांच्या चांगल्या कामगिरीमुळं चालू आर्थिक वर्ष 2023-24 च्या पहिल्या सहामाहीत देशाचे सकल देशांतर्गत उत्पादन (GDP) वेगाने वाढले आहे. भारतीय रिझर्व्ह बँकेचे (RBI) माजी गव्हर्नर रघुराम राजन यांच्या मते, भारताला अजूनही खूप काही करण्याची गरज आहे. 2025 पर्यंत 5 ट्रिलियन अर्थव्यवस्था बनण्याचे लक्ष्य अशक्य आहे. भारत सरकार 5 ट्रिलियनची अर्थव्यवस्था निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे.

भारताचा विकास दर मजबूत असूनही खासगी गुंतवणूक आणि खासगी उपभोग वाढलेला नाही. आपण यावर्षी इतकी चांगली कामगिरी का कारण पहिल्या सहामाहीत पायाभूत सुविधांवर सरकारने प्रचंड खर्च केला आहे. भारताने जगातील सर्वात वेगाने वाढणारी प्रमुख अर्थव्यवस्था म्हणून आपला दर्जा कायम ठेवला आहे. सरकारी खर्च आणि मॅन्युफॅक्चरिंगच्या ताकदीमुळे जुलै-सप्टेंबर तिमाहीत GDP वाढीचा दर 7.6 टक्के होता. आम्ही तुम्हाला सांगतो की, गेल्या चार वर्षांत भारतीय अर्थव्यवस्थेची वार्षिक सरासरी चार टक्के दराने वाढ झाली आहे.

भारतीय अर्थव्यवस्था आता चमत्कारांवर अवलंबून 

देशात पुरेशा नोकऱ्या निर्माण होत नसल्यामुळे भारताला अधिक वेगाने विकसित होण्याची गरज आहे, यावर प्रख्यात अर्थतज्ज्ञांनी भर दिला आहे. जोपर्यंत चमत्कार घडत नाही तोपर्यंत 2025 पर्यंत भारताला 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनणे जवळजवळ अशक्य आहे. सध्या आपण 3,500 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था आहोत. 5,000 अब्ज डॉलरची अर्थव्यवस्था होण्यासाठी पुढील दोन वर्षात 12 ते 15 टक्क्यांनी वाढ करावी लागेल असे रघुराम राजन म्हणाले.

अमेरिका जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश

अमेरिका हा जगातील सर्वात मोठी अर्थव्यवस्था असलेला देश आहे. अमेरिकेचा जीडीपी हा 25.5 ट्रिलियन डॉलर आहे. तर 18 ट्रिलियन डॉलरच्या अर्थव्यवस्थेसह चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर जपानचा 4.2 ट्रिलियन डॉलर्स आणि जर्मनीची अर्थव्यवस्था ही 4 ट्रिलियन डॉलर्सची आहे. दरम्यान, S&P ग्लोबल मार्केट व्यतिरिक्त, इतर अनेक जागतिक संस्थांनी देखील असे दावे केले आहेत. सध्याच्या काळात भारताचा GDP 2022 मध्ये 3.5 ट्रिलियन डॉलर आहे, जो 2030 पर्यंत वाढून 7.3 ट्रिलियन डॉलर होईल. 

महत्त्वाच्या बातम्या:

Indian Economy: भारत जपानला टाकणार मागे? लवकरच होणार जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था 

[ad_2]

Related posts