Dawood Ibrahim: मुंबई सिरिअल ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिमवर विषप्रयोग? पाकिस्तानच्या रुग्णालयात भरती असल्याची माहिती

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com) <p style="text-align: justify;"><strong>Dawood Ibrahim:</strong> 1993 मधील मुंबई सिरिअल ब्लास्टचा मास्टरमाईंड दाऊद इब्राहिम (Dawood Ibrahim) याला पाकिस्तानच्या (Pakistan) कराचीतील (Karachi) एका खासगी रूग्णालयात भरती केल्याची माहिती आहे. एका अज्ञात व्यक्तीनं विषप्रयोग केल्यानंतर कुख्यात डॉन दाऊदची तब्येत चिंताजनक झाल्यानं त्याला रूग्णालयात भरती करण्यात आल्याची माहिती पाकिस्तानी मिडियाद्वारे कळते आहे. मात्र यासंदर्भात भारत (India) किंवा पाकिस्तान सरकारकडून कुठल्याही प्रकारची पुष्टी करण्यात आली नाही. मात्र ही बातमी सत्य असल्याची शक्यता एवढ्यासाठी बळावते आहे कारण कराची, इस्लामाबाद आणि रावळपिंडी या तीन महत्वाच्या शहरांमधे इंटरनेटसेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.&nbsp;</p>

[ad_2]

Related posts