India’s Top Tourist Friendly Cities Places And States Travellers Visited Most Hyderabad Uttar Pradesh Bengaluru Travelopedia 2023  marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

 Indias top tourist friendly cities  :  प्रवाशांना सर्वाधिक लोकप्रिय वाटणारं शहर कोणतं? असा जर प्रश्न तुमच्या मनात आल असेल तर त्याचं उत्तर आहे ‘हैदराबाद’ (Hyderabad). सर्वात जास्त प्रवाशांनी हैदराबादला पसंती दिली आहे. तर उत्तर प्रदेशमध्ये (Uttar Pradesh) सर्वाधिक प्रवाशांनी प्रवास केला आहे. OYO ट्रॅव्हलोपीडिया 2023 ने याबाबतची माहिती दिली आहे. शहराचा विचार केला हैदराबादनंतर बंगळुरुचा क्रमांक लागतो.

उत्तर प्रदेश हे प्रवाशांनी सर्वाधिक भेट देणारे राज्य ठरले आहे. या यादीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. OYO ने दिलेल्या माहितीनुसार, वार्षिक प्रवास ट्रेंड इंडेक्स – ‘Travelopedia 2023’ नुसार, वर्षातील इतर कोणत्याही वीकेंडच्या तुलनेत 30 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान सर्वाधिक बुकिंग झाले आहेत.

कोणत्या शहरात आले सर्वाधिक प्रवासी?

हैदराबाद हे भारतातील सर्वाधिक प्रवाशांनी बुकींग केलेले शहर आहे. त्यापाठोपाठ बंगळुरु, दिल्ली आणि कोलकाता यांचा क्रमांक लागतो. दुसरीकडे गोरखपूर, दिघा, वारंगल आणि गुंटूर सारख्या लहान शहरांमध्ये सर्वाधिक वार्षिक बुकिंगमध्ये वाढ झाली आहे. OYO ने दिलेल्या माहितीनुसार, 2023 मध्ये जयपूर हे लोकप्रिय हॉलिडे डेस्टिनेशनमध्ये अव्वल आहे. त्यानंतर गोवा, म्हैसूर आणि पुद्दुचेरीचा क्रमांक लागतो.

बुकींगच्या बाबतीत कोणतं तिर्थक्षेत्रे आघाडीवर?

बुकींगच्या बाबतीत पुरीला अध्यात्मिक आणि तीर्थक्षेत्रांमध्ये अव्वल स्थान मिळाले आहे. यानंतर अमृतसर, वाराणसी आणि हरिद्वार या शहरांचा क्रमांक लागतो. देवघर, पलानी आणि गोवर्धन सारख्या कमी ज्ञात अध्यात्मिक स्थळांवर पर्यटकांची संख्याही लक्षणीय वाढल्याचे निवेदनात म्हटले आहे. राज्यांबद्दल बोलायचं झालं तर उत्तर प्रदेश या वर्षी सर्वाधिक बुक झालेले राज्य होते. त्यापाठोपाठ महाराष्ट्र, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो.

महत्त्वाच्या बातम्या:

Year Ender 2023 : जगात लोकांनी Google वर सर्वास जास्त सर्च केलेले ठिकाणं कोणते? ‘या’ यादीतील एक नाव वाचून अभिमान वाटेल!

[ad_2]

Related posts