Weather Updates Heavy Rain Wreaks Havoc In Tamil Nadu Fog Smog Snowfall Engulf North India

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Weather Update Today : देशात कुठे पाऊस (Rain) तर कुठे थंडीची लाट (Cold Wave) पाहायला मिळत आहे. तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. तामिळनाडूमध्ये सोमवारी रेकॉर्डब्रेक पाऊस झाला आहे. तामिळनाडूमध्ये जोरदार पावसामुळे तिरुनेलवेली आणि थुथुकुडी जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पूरस्थिती निर्माण झाली आहे. या भीषण पूरस्थितीमुळे भारतीय हवाई दल आणि भारतीय लष्कराला पाचारण करत बचावकार्य राबवलं जात आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) दिलेल्या माहितीनुसार, दक्षिण तामिळनाडूमधील 39 प्रदेशांमध्ये अत्यंत मुसळधार पाऊस झाला. 19 डिसेंबरला कन्याकुमारी, तिरुनेलवेली, थुथुकुडी आणि तेनकासी जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेश बर्फाच्छादित असताना देशातील अनेक भागांमध्ये तापमानात घट झाली आहे.

तामिळनाडूमध्ये पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याने (IMD), तामिळनाडूमध्ये (Tamil Nadu) पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा (Rain Prediction) इशारा दिला आहे. आयएमडी (IMD) च्या मते, दक्षिण श्रीलंकेच्या किनार्‍याजवळ विषुववृत्तीय हिंदी महासागर आणि लगतच्या नैऋत्य बंगालच्या उपसागरावर असलेले चक्रीवादळ आता कोमोरिन क्षेत्र आणि शेजारच्या परिसरात आहे. मंगळवारी, दक्षिण तामिळनाडूमध्ये काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस झाला आहे. त्यासोबत उत्तर तामिळनाडू, पुडुचेरी आणि कराईकलमध्ये काही ठिकाणी गडगडाटी वादळ आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

उत्तर भारतात थंडीची लाट

दिल्लीत थंडीची तीव्रता वाढताना दिसत आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, गेल्या अनेक दिवसांपासून पर्वतीय भागांत झालेल्या बर्फवृष्टीमुळे दिल्लीत थंड वारे येत आहेत. परिणामी तेथील पारा घसरला आहे. उत्तर-पश्चिम दिशेकडून येणाऱ्या या वाऱ्यांचा वेग सोमवारीही वाढला आहे. त्यामुळे सकाळ-संध्याकाळ थंडीचा कडाका जाणवत आहे. दिल्लीत पुढील तीन दिवस आकाश ढगाळ राहील आणि सकाळी हलके धुके दिसेल.

‘या’ भागात पावसाची शक्यता

उत्तर तामिळनाडू (Tamil Nadu), उत्तर केरळ (Kerala) आणि अंदमान निकोबार बेटांवर (Andaman and Nicobar Islands) हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. आंध्र प्रदेश आणि दक्षिण कर्नाटकच्या दक्षिण किनारपट्टीवर हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर-पश्चिम भारत आणि मध्य भारताच्या काही भागांमध्ये किमान तापमानात किंचित घट होईल. नुकत्याच झालेल्या वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे जम्मू-काश्मीरच्या काही भागात जोरदार बर्फवृष्टी झाली आहे. शिवाय, मध्यवर्ती आणि वरच्या भागात चांगली हिमवृष्टीसह हा हंगामातील सर्वात मोठा काळ होता.

[ad_2]

Related posts