Gadchiroli Government Hostel Students Poisoned

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)


Gadchiroli Students Poisoned : गडचिरोलीत शासकीय आश्रमशाळेतील मुलींना जेवणातून विषबाधा

गडचिरोलीच्या धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय मुलींच्या आश्रम शाळेतील शंभरहून अधिक विद्यार्थिनींना जेवणातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला असून जवळपास 73 विद्यार्थिनींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आश्रम शाळेच्या विद्यार्थिनींनी दुपारच्या सुमारास आलू कोबी, भाजी, वरण, भात असे जेवण केल्यानंतर काही विद्यार्थिनींना उलट्या आणि हगवणचा त्रास सुरू झाला. ही बाब शिक्षकांच्या लक्षात येतात त्यांना धानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र विद्यार्थ्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने 73 विद्यार्थिनींना गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात हलवण्यात आले आहे. सध्या विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर असली तरी या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Related posts