[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
मुंबई: नागपुरातील हिवाळी अधिवेशन सुटताच राज्याचे काही मंत्री हे मनोज जरांगे (Manoj Jarange) यांच्या भेटीसाठी जाणार आहेत. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर (Maratha Reservation) 24 डिसेंबर ही डेडलाईन दिली असल्याने त्यावर चर्चा करण्यासाठी राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि इतर मंत्री त्यांची भेट घेणार आहेत.
मराठा आरक्षणाच्या विषयावर शिंदे समितीचा अहवाल प्राप्त झाला असून त्या संदर्भात फेब्रुवारीमध्ये विशेष अधिवेशन घेण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी जाहीर केलं आहे. त्यानंतर फेब्रुवारीचा प्रस्ताव मान्य नसून 24 डिसेंबरपर्यंत मराठ्यांना आरक्षण द्यावं या मागणीव मनोज जरांगे ठाम आहेत. 24 डिसेंबर पर्यंत जर मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर आंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
जोपर्यंत आरक्षण नाही तोपर्यंत निवडणुका नाहीत
मराठा आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत राज्यात निवडणुका होणार नाही असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी फेब्रुवारी महिन्यात विशेष अधिवेशन बोलावून मराठा आरक्षणाचा तिढा सोडवणार असल्याचे म्हटले आहे. विशेष म्हणजे फेब्रुवारी महिन्यात राज्यात निवडणुकांची आचारसंहिता लागणार असल्याच्या चर्चा आहेत.
मराठा समाज बीडमध्ये एकत्रित येणार
राज्य सरकारने 24 डिसेंबरपर्यंत जर मराठा आरक्षण दिलं नाही तर आंदोलन करण्याचा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे. त्याच पार्श्वभूमीवर 23 डिसेंबर रोजी घराघरातील मराठा समाज बीडमध्ये एकत्रित येणार आहे. सरकार आम्हाला आंदोलनाची वेळ येऊ देणार नाही असं वाटते, मुख्यमंत्र्यांनी निर्णय मोठा घेतला त्यांच्या धाडसाचे कौतुक असल्याचे देखील जरांगे म्हणाले.
मागासवर्गीय आयोगाचे आदेश गरजेचे, अहवाल नाही
कुणबी समाजाच्या ज्या नोंदी सापडल्या आहेत त्यासाठी कोणत्याही अहवालाची गरज नाही, त्यासाठी फक्त आदेशाची आवश्यकता असल्याचं मनोज जरांगे म्हणाले. ते म्हणाले की, रक्ताचे नातेवाईक कसं धरणार यासाठी काही अट लावणार असेल तर त्यासाठी आदेश गरजेचा आहे. तसं झालं तर फेब्रुवारीची आम्हाला वाट पाहायची गरज नाही, आम्हाला न्याय मिळेल.
मनोज जरांगे म्हणाले की, 1967 पासून ज्यांच्या नोंदी मिळाल्या आहेत त्याचा लाभ रक्ताच्या नातेवाईकांना मिळणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ते एक चांगलं झालं. कारण नातेवाईकांना आरक्षणाचा देण्याचं जाहीर केल्यामुळे महाराष्ट्रातल्या सर्व मराठ्यांना आरक्षण मिळणार आहे. मुख्यमंत्र्यांनी जी काही घोषणा केली त्यावर आपण काही अंशी समाधानी आहोत, पण पूर्ण समाधानी नाही.
ही बातमी वाचा:
[ad_2]