Pune Water Supply News There Will Be No Water Supply In Most Parts Of The City On Thursday As The Pune Municipal Corporation

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Pune Water Supply News : पुणे आणि पिंपरी चिंचवड शहराचा पाणी पुरवठा आज बंद करण्यात आला आहे. देखभालीच्या कामासाठी चिंचवडमध्ये (Pimpri-Chinchwad water) पाणी कपात (water cut) करण्यात आली आहे. दुसरीकडे पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला (Pune Municipal Corporation) पाणी बचत करा अशा सुचना दिल्या आहेत. त्याल कारणही तसेच आहे, कारण पुण्याला पुरवठ करणाऱ्या चारही धरणात गतवर्षीपेक्षा यंदा कमी पाणी आहे. त्यामुळे जानेवारी महिन उजडायच्या आधीच पुणे शहरावर पाणी कपातीची टांगती तलवार आहे. पुणेकरांनी आतापासूनच पाणी जपून वापरायल सुरुवत करायल हवी. 

पुणे शहरात पाण्याची बचत करा, अशा सूचना पाटबंधारे विभागाने पुणे महानगरपालिकेला दिल्या आहेत. पुणे शहरात तूर्तास तरी पाणी कपातीचा निर्णय झाला नसला तरी धरणातील कमी झालेला एकूण पाणीसाठा चिंतेची बाब ठरू लागली आहे. चार धरणात ७८.४७ टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. गेल्यावर्षी हाच साठा ८८.४१ टक्के इतका होता. म्हणजेच, गतवर्षीपेक्षा दहा टक्के कमी पाणी चार धरणात आहे. 

पाणीसाठ्यावरुन येत्या काही दिवसात पाटबंधारे विभागासोबत पुणे महानगरपालिकेचे अधिकारी बैठक घेण्याची शक्यता आहे. पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळी क्षेत्रात सुद्धा पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार कायम आहे. आगामी काळा निवडणुकीचा असल्यामुळे पाणी पुण्यात कपातीचे निर्णय शासनाला घेणं कितपत फायद्याचं राहणार आहे, हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. 

पुणे जिल्ह्यातील धरण साखळी पाणीसाठी (टक्केवारी)

खडकवासला: ७७.०७ टक्के

पानशेत: ८८.२७ टक्के

वरसगाव: ८२.०५ टक्के

टेमघर: ३८ टक्के

मागील वर्षी आजच्या तारखेला असणारा एकूण चार धरणे मिळून पाणीसाठा: ८८.४१ टक्के इतक होता. या वर्षी आजच्या तारखेला असणारा एकूण ४ धरणे मिळून पाणीसाठा: ७८.४७ टक्के इतका आहे. यंदा राज्यात पाऊस हवा तितका पडला नाही, त्यामुळे धरणातील पाणीसाठाही मर्यादीत आहे. पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या चार धरणात गेल्यावर्षी पेक्षा दहा टक्के कमी पाणीसाठा आहे. त्यामुळे पुणेकरांवर आतापासूनच पाणी कपातीची टांगती तलवार आहे. 

पुण्यात पाण्याचा तुडवडा

यंदाच्या वर्षात मुबलक पाऊस न झाल्याने पुणेकरांवर पाणी संकट कोसळलं आहे. त्यामुळे पुण्यातील धरणं ही 100 टक्के भरली नाहीत. म्हणूनच उपलब्ध पाणीसाठ्याचे काटेकोर नियोजन करावे लागणार आहे. तसेच या पाण्याचे वापर देखील योग्य प्रमाणात करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी जपून वापरा अन्यथा जानेवारीपासून पाणीकपात करण्याचा इशारा महापालिकेकडून जलसंपदा विभागाला देण्यात आला होता. 

[ad_2]

Related posts