जम्मू-काश्मीरमधील पुंछमध्ये दहशतवादी हल्ला; भारतीय लष्कराच्या वाहनावर गोळीबार

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

जम्मू-काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात दहशतवादी हल्ला झाला आहे. दहशतवाद्यांनी भारतीय लष्कराच्या ट्रकवर गुरुवारी (21 डिसेंबर) गोळीबार केला. पीटीआय वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जवानांना घेऊन जाणाऱ्या ट्रकवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. 

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, पुंछ जिल्ह्यातील सुरनकोट भागातील ‘डेरा की गली’ मध्ये लष्कराने शोधमोहीम सुरू केली होती. या भागात चकमक सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. 

 

 

दहशतवाद्यांना चोख प्रत्युत्तर देण्यासाठी सुरक्षा दलाची अतिरिक्त कुमक घटनास्थळी पाठवण्यात आल्याची माहिती आहे. 



[ad_2]

Related posts