[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
नवी दिल्ली : काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ‘भारत जोडो यात्रा’चा (Bharat Jodo Yatra) दुसरा टप्पा सुरु करणार आहेत. राहुल गांधींची ही भारत जोडो यात्रा अरुणचाल प्रदेश ते गुजरात अशी असणार असल्याची माहिती देण्यात आलीये. गुरुवार 21 डिसेंबर रोजी पार पडलेल्या काँग्रेसच्या कार्यकारिणीच्या बैठकीत (Congress Working Committee) काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी भारत जोडो यात्रा भाग 2 चा उल्लेख केला.
या कार्यकारिणीच्या बैठकीत अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी ही बाब समोर आणली. राहुल गांधी यांनी त्यांची भारत जोडो यात्रा पुन्हा सुरु करावी अशी मागणी होत असल्याचं खरगेंनी या बैठकीत सांगितलं. यावर बोलताना खरगेंनी म्हटलं की, मी भारत जोडो यात्रेचा मुद्दा राहुल गांधी यांच्यासमोर कार्यकारिणीत मांडतो आणि निर्णय तुम्हा सर्वांवर सोडतो.
राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेचा प्रवास
राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 12 सप्टेंबर रोजी तामिळनाडूतील कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू केली होती. राहुल गांधी यांची ही यात्रा काश्मीरमध्ये संपली. कन्याकुमारी ते काश्मीर अशी ही यात्रा होता. या प्रवासात 136 दिवसांत चार हजार किलोमीटरहून अधिक अंतरावरचा प्रवास त्यांनी केलाय. भारताला एकत्र आणणे, एकत्र येणे आणि देशाला बळकट करणे हा या भारत जोडो यात्रेचा मुख्य उद्देश असल्याचं काँग्रेसकडून सांगण्यात आलं होतं. यात्रेदरम्यान राहुल गांधींनी अनेक जाहीर सभांना संबोधित करत केंद्र सरकारवर निशाणा साधला. दरम्यान या संपूर्ण प्रवासादरम्यान राहु गांधी यांनी हाफ टी-शर्ट परिधान केला हा देखील मुद्दा चर्चेत आला होता.
भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा पहिल्या टप्प्यापेक्षा वेगळा असणार?
यापूर्वी राहुल गांधी यांनी 7 सप्टेंबर 2022 रोजी कन्याकुमारी येथून भारत जोडो यात्रा सुरू केली होती आणि 30 जानेवारी 2023 रोजी जम्मू-काश्मीरमध्ये ती यात्रा संपवली होती. भारत जोडो यात्रा 2.0 चा टप्पा लवकरच सुरु होण्याची शक्यता आहे. तसेच ही यात्रा तब्बल तीन महिने सुरू राहणार असल्याचं सांगण्यात यआहे. हा प्रवास मागील प्रवासापेक्षा वेगळा असेल, असंही बोललं जात आहे. मागच्या वेळी राहुल गांधींनी संपूर्ण प्रवास पायी केला होता, तर यावेळी कुठे पायी आणि कुठे गाडीनं प्रवास पूर्ण करणार आहेत.
हेही वाचा :
Rahul Gandhi : PM मोदींना उद्देशून ‘खिसेकापू’ टिप्पणी चुकीची; राहुल गांधींच्या वक्तव्याविरोधात दिल्ली हायकोर्टाने दिले ‘हे’ निर्देश
[ad_2]