Budh Gochar मुळे 3 मोठे Rajyog! गजकेसरी, बुधादित्य आणि भद्रा महापुरुष राजयोगामुळे मालामाल होणार 6 राशी

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Budh Rashi Parivartan 2023 : वैदिक ज्योतिषशास्त्रात ग्रह गोचरला विशेष महत्त्व आहे. प्रत्येक ग्रह एका ठराविक काळानंतर आपलं स्थान बदलतो. जूनमधील ग्रह गोचरमध्ये सर्व प्रथम ग्रहांचा राजकुमार बुध ग्रह बुधवारी सायंकाळी 7.58 वाजता वृषभ राशीत प्रवेश करत आहे. त्यानंतर बुध 24 जूनला दुपारी 12.41 पुन्हा आपलं घर बदलणार असून तो मिथुन राशीत प्रवेश करणार आहे. मिथुन राशीत बुध  8 जुलै 2023 दुपारी 12.05 मिनिटांपर्यंत राहणार आहे. त्यावेळी भद्रा महापुरुष राजयोग जुळून येणार आहे. (Mercury Transit 2023)

तर वृषभ राशीत बुध आणि सूर्य यांच्या संयोगाने बुधादित्य राजयोग तयार होत आहे. तर गुरु आणि चंद्र मकर राशीत असल्यामुळे गजकेसरी राजयोगही जुळून येत आहे. बुधादित्या योगामुळे सर्व राशींवर प्रभाव पडणार आहे. पण 6 राशींच्या लोकांचं नशिब फळफळणार आहे. (budhaditya gaj kesari and Bhadra Purush Rajyog 7 june sun mercury and jupiter moon conjunction Budh Gochar 2023 get money 6 zodiac signs)

‘या’ राशी होणार श्रीमंत?

वृषभ (Taurus)

या राशीच्या लोकांसाठी हे राजयोग अतिशय शुभ ठरणार आहे. वैवाहिक जीवनात आनंद असणार आहे. कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे. धनलाभ होणार आहे. तब्येतीमध्ये सुधारणा होणार आहे. 

कर्क (Cancer)

या राशीच्या लोकांसाठी राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. प्रगती, संपत्ती आणि करिअरमध्ये यश प्राप्त होणार आहे. अनेक ठिकाणाहून धनलाभ होणार आहे. जुन्या गुंतवणुकीतून आर्थिक फायदा होणार आहे. परदेशी जाण्याचे योग आहे. कुटुंबात आनंदाचे वातावरण असणार आहे. 

तूळ (Libra)

तूळ राशीच्या लोकांसाठी राजयोग अतिशय फलदायी ठरणार आहे. चांगली नोकरी आणि प्रगतीचे उंच शिखर तुम्ही सर करणार आहात. जोडीदारासोबत नातं मजबूत होणार आहे. कुटुंबात एखादे शुभ कार्य ठरणार आहे. मुलांच्या प्रगतीने आनंद होणार आहे. 

कन्या (Virgo)

या राशीच्या लोकांना राजयोगाचा लाभ होणार आहे. कौटुंबिक वातावरण आनंद राहणार आहे. अडकलेली कामं सहज पूर्ण होणार आहे. आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे. नवीन व्यवसाय सुरु करण्यासाठी ही सुवर्ण संधी आहे. अविवाहित लोकांचे लग्न ठरण्याचे योग आहेत. 

मीन (Pisces)

या राशीच्या लोकांसाठी राजयोग भाग्यशाली ठरणार आहे. पदेशात नोकरीची योग आहेत. गुंतवणुकीतून फायदा होणार आहे. कुटुंबातून आनंदाची बातमी मिळणार आहे. अविवाहित लोकांच्या आयुष्यात रोमान्सची एन्ट्री होणार आहे. मालमत्ता किंवा जमीन खरेदीची ही योग वेळ आहे. 

सिंह (Leo)

या राशीच्या लोकांना राजयोगातून आर्थिक फायदा होणार आहे. अडकलेले पैसे परत मिळणार आहे. अनेक मार्गाने धनलाभाचे योग आहे. बँक बँलेन्स तगड असणार आहे. बेरोजगारांना नोकरी मिळणार आहे.  राजकारणाशी संबंधित लोकांनासाठी हा काळ उत्तम ठरणार आहे. 

(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)

 

Related posts