Odisha Train Accident Passanger Cancel Ticket IRCTC Rejected Congress Claim News Marathi

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Odisha Train Accident : ओडिशातील (Odisha) बालासोर (Balasor) येथे झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण देश हादरला आहे. हा अपघात घडवून आणला आहे असेही म्हणले जात आहे. तसेच या दुर्घटनेला जातीय रंग देण्याचा ही प्रयत्न केला जात आहे. या घटनेनंतर अनेक लोक विविध दावे करत आहेत. अशातच काँग्रेसने ट्वीट (Tweet) केले, ज्यात त्यांनी दावा केला आहे की, रेल्वे अपघातानंतर भीतीचे वातावरण तयार झाले आहे. भीतीमुळे अनेक प्रवासी आपले रेल्वे तिकिटे रद्द करत आहेत. यावर IRCTC ने उत्तर दिलं आहे. काँग्रेसचा दावा चुकीचा असल्याचं आयआरसीटीसीने म्हटलं आहे.

IRCTC ने काय सांगितले? (What IRCTC Said)

IRCTC ने सांगितले आहे की, काँग्रेसने केलेला दावा हा चुकीचा आहे. याउलट प्रवासी तिकीट रद्द करत नाहीत तर 1 जून रोजी तिकीट रद्द करणाऱ्यांची संख्या 7.7 लाख होती जी 3 जून रोजी 7.5 लाख इतकी झाली आहे.

काँग्रेसने काय दावा केला होता?

काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन सोमवारी संध्याकाळी एक व्हिडिओ शेअर करण्यात आला होता. या व्हिडिओमध्ये काँग्रेस नेते भक्त चरण दास म्हणाले होते की, “असा रेल्वे अपघात यापूर्वी कधीही झाला नव्हता. शेकडो लोकांना जीव गमवावा लागला तर हजारांहून अधिक लोक जखमी झाले. ही अतिशय दु:खद घटना आहे. अपघातानंतर भीतीमुळे हजारो लोकांनी तिकीटे रद्द केली आहेत. ट्रेनमधून प्रवास करणं त्यांना सुरक्षित वाटत नाही.” यावर IRCTC ने वरील उत्तर दिले.

काँग्रेसने आता मोदी सरकारला घेरले आहे.

काँग्रेसने (Congress) या घटनेवरुन मोदी सरकारवर पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. काँग्रेसच्या सोशल मीडिया प्रमुख सुप्रिया श्रीनेत म्हणाल्या की, सुमारे 300 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे आणि आजही या मृत्यूंना कोण जबाबदार आहे याचे उत्तर नाही? या देशातील सामान्य माणूस रेल्वेने प्रवास करतो. उद्या तुम्ही, तुमचे कुटुंब आणि देशातील जनता ट्रेनमध्ये प्रवास कराल तेव्हा लक्षात ठेवा की तुम्ही हा प्रवास तुमच्या जबाबदारीवर करत आहात, यात सरकारची कोणतीही जबाबदारी नाही. ते पुढे म्हणाले, रेल्वेमंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारन राजीनामा द्यावा, लक्ष वळवण्यासाठी नवनवीन थेअरी तयार केल्या जात आहेत. या सरकारमध्ये जबाबदारीचा ‘ज’ ही नाही.

इतर महत्वाच्या बातम्या

Indian Railways : भारतीय रेल्वेने 2017-2022 दरम्यान सुरक्षेवर एक लाख कोटी खर्च केले, कागदपत्रांमधून माहिती समोर



[ad_2]

Related posts