Mahavikas Aghadi Lok Sabha Election Seat Formula Know How Many Seats To Which Party Congress Shiv Sena NCP

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

छत्रपती संभाजीनगर:  लोकसभा निवडणुकीसाठी (Lok Sabha Election 2024)  महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi)   जागावाटपाचा फॉर्म्युला अखेर ठरला आहे. येत्या 29 आणि 90 डिसेंबर रोजी ठरणार आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi)  यांच्या नागपूर (Nagpur)  दौऱ्यानंतर दिल्लीत जागावाटपाबाबत बैठक होणार आहे. जागावाटपाबात दोन फॉर्म्युलांवर चर्चा होऊ शकते. महत्त्वाचं म्हणजे छत्रपती संभाजीनगरची जागा लढवण्यासाठी एका पक्षातील बडा नेता काँग्रेसमध्ये (Congress)  प्रवेश करु शकतो असंही कळतं. 

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही महिन्यांचा कालावधी शिल्लक असताना आता राजकीय पक्षांकडून लोकसभा जागा लढवण्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे. देशव्यापी पातळीवरील इंडिया आघाडीतील महाविकास आघाडीतही (Maha Vikas Aghadi) जागा वाटपाचे सूत्र निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. राज्यात लोकसभेच्या 48 जागा आहेत. लोकसभा निवडणुकीसाठी शिवसेना ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस यांचा समावेश असलेल्या महाविकास आघाडीमध्ये जागा वाटप जवळपास निश्चित झाल्याची चर्चा आहे. अशातच आता सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसने आगामी लोकसभा निवडणुकीत 15 ते 16 जागा लढवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे

पहिला फॉर्म्युला

  •  ठाकरे सेना – 20 
  • काँग्रेस – 16
  • शरद पवार गट – 10
  • बाळासाहेब आंबेडकर/राजू शेट्टी – 02

दुसरा फॉर्म्युला

  • 23 ठाकरे गट 
  • 15 काँग्रेस
  • 10 शरद पवार गट

मविआसोबत आणखी कोणते पक्ष?

महाविकास आघाडीसोबत डाव्या-प्रागतिक पक्षांची आघाडी आहे. यामध्ये डावे पक्ष, समाजवादी पक्ष, शेकाप आदी पक्ष आहेत. तर,  वंचित बहुजन आघाडीची शिवसेना ठाकरे गटासोबत युती आहे. त्यामुळे जागा वाटप करताना या पक्षांनादेखील विचारात घ्यावे लागणार आहे. या पक्षांना लोकसभेसाठी जागा न सोडल्यास विधानसभेसाठी जागा मविआला सोडाव्याच लागणार आहेत. त्यामुळे मविआमध्ये लोकसभा जागा वाटप वर दिलेल्या फॉर्म्युलाप्रमाणे होतो की आणखी काही फॉर्म्युला ठरतोय, हे लवकरच समजेल. 

 शिवसेना ठाकरे गट महाराष्ट्रात लोकसभेच्या 23 जागा लढवणारच: संजय राऊत 

शिवसेना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गट महाराष्ट्रात लोकसभेच्या (Maharashtra Lok Sabha Elections) 23 जागा लढवणारच, असा निर्धार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केला. काँग्रेसच्या (Congress) दिल्लीतील (Delhi) नेत्यांशी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. आमची चर्चा ही दिल्लीतील नेत्यांशीच होईल, राज्यातील नाही, असं म्हणत संजय राऊत यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील नेत्यांना फटकारलं. महाराष्ट्रात काँग्रेसचा एकही नेता नाही, जो निर्णय घेऊ शकेल, जर नेता आहे तर त्याला निर्णयाचा अधिकार नाही. 

हे ही वाचा :

मोठी बातमी : ठाकरेंची शिवसेना लोकसभेच्या 23 जागा लढणार, संजय राऊतांची घोषणा, जागावाटपाची चर्चा दिल्लीत होणार

 

[ad_2]

Related posts