Four People Murder In Nashik City And District In 48 Hours Nashik Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरासह जिल्ह्यात मागील दोन दिवसांत चार खुनाच्या गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे. यात नाशिक शहरातील एक आणि जिल्ह्यातील अन्य तालुक्यातील तीन खुनाच्या घटनांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे शहरासह जिल्ह्यात देखील मोठ्या प्रमाणावर गुन्हेगारी फोफावत असल्याने नागरिकांचे जिणे मुश्किल झाल्याचे चित्र आहे. 

दरम्यान नाशिक (Nashik District) शहरासह जिल्ह्यातील मालेगाव (Malegaon), चांदवड (Chandwad) आणि लासलगाव (Lasalgaon) तालुक्यात खुनाच्या घटना समोर आल्या आहेत. यात कुठे हळदी कार्यक्रमातील वादातून, व्यवसायिक वादातून, शिवी दिल्या वरून, जुनी कुरापत काढून खुनाच्या घटना उघडकीस आलेल्या आहेत. यामुळे नाशिकमध्ये गुन्हेगारीचे प्रमाण किती वाढली आहे, याचा अंदाज येत आहे. 

फुगेवाल्याला संपवलं! 

नाशिकरोड येथील सिन्नर फाटा परिसरात सोमवारी सायंकाळच्या दरम्यान किरकोळ कारणाच्या वादातून युवकाचा चाकूने (Murder) हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली. रेल्वे प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या बाहेर सिन्नर फाटा येथे ही घटना घडली. या प्रकरणी नाशिक रोड पोलीस ठाण्यात उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. अजय काळे असे हत्या झालेल्या व्यक्तीचे युवकाचे नाव आहे. याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की, नाशिक रोड रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म क्रमांक चारच्या बाहेर फुगे विक्रेत्यांमध्ये किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. त्याचे रूपांतर हाणामारीत व दगडफेकीत झाले. त्यानंतर संशयित आदित्य नागेश शिंदे याने आणि त्याच्यासोबतच्या नातेवाईकांनी अजय काळे या युवकावर चाकूने वार केले. वार वर्मी लागल्याने उपचार घेताना तो मयत झाला. या घटनेनंतर संशयित आरोपीनी शकील उदास भोसले यांच्यावर हल्ला केला, त्यात संबंधित युवक गंभीर जखमी झाला असून त्यावर बिटको हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहे. 

शिविगाळ केली म्हणून संपवलं 

दुसरी घटना लासलगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून निफाड बस स्थानकाच्या मागे मयत बाळासाहेब पोतले यांचे घर आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 1 जून रोजी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास घटना घडली होती. यावेळी संशयित रामदास सालकडे, सुनील मोरे, हे दोघे मयत बाळासाहेब यांच्या घरी गेले. यानंतर हे तिघेही गप्पा मारत असतांना मयत बाळासाहेब यांनी संशयितांना शिवीगाळ केली. यावरून संशयितांनी शिवीगाळ का करत आहेत? याबाबत मयत बाळासाहेब यांना विचारले असता ते कॉटवरुन उठुन संशयितांकडे दिशेन पुढे सरकले. यावेळी संशयितांनी बाळासाहेब यांना जोरात धक्का दिला असता ते कॉटवर डोक्यावर पडले. यानंतरही संशयितांनी मयत बाळासाहेब यांचे तोंड दाबून धरून जीव जाईपर्यंत दाबून धरले. यातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लासलगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हळदीच्या कार्यक्रमात खून 

तिसरी घटना मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली आहे. हळदीच्या समारंभात झालेल्या वादातून ही खुनाची घटना घडली आहे. येथील विकास शंकर अहिरे यांच्या मुलीच्या लागाचा हळदीचा कार्यक्रम सुरु होता. याचवेळी कार्यक्रमात अजय वाघ, अमित पगारे, आर्यन आहीरे यांच्यात नाचण्यावरुन वाद झाला. हा वाद मिटवण्यासाठी फिर्यादीचा भाऊ सतीष श्रावण मोरे हा गेला असता संशयितांनी त्यास शिवीगाळ करुन ‘आज याला जिवंत सोडायचे नाही, मारुन टाकु’ असे असे सांगितले. त्यांनी हातातील धारदार हत्याराने पोटावर, मांडीवर वार करुन गंभीर दुखापत केल्याने संतोषचा मृत्यू झाला. 

जाब विचारण्यासाठी गेला म्हणून… 

तर चौथी घटना वडनेर भैरव पोलीस ठाण्याच्या अधिक घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चांदवड तालुक्यातील धोंडगव्हान वाडीवर ही घटना घडली आहे. मयत व संशयित हे एकाच गावातील जवळच राहणारे असुन फिर्यादीचा मुलगा सचिन बहादुरसिंग परदेशी याने संशयितांची याची चुलती हिला शिव्या दिल्याचा आणि जुन्या भांडणाचा राग मनात धरुन काटा काढला आहे. फिर्यादीचा मुलगा सचिन बहादुरसिंग परदेशी हा कु-हाड हातात घेवुन त्याच्या शेतातील झाड तोडण्यासाठी जात असतांना त्याला संशयिताने शिवीगाळ केली. यावरून जाब विचारण्यासाठी गेला असता संशयिताने त्याच्या हातातील कु-हाड हिसकावुन घेवुन सचिन परदेशीच्या डोक्यात मारली. कुऱ्हाडीचा वर्मी घाव बसल्याने गंभीर दुखापत होऊन अधिक रक्तश्राव झाला, यातच त्याचा मृत्यू झाला आहे. 

[ad_2]

Related posts