Ram Temple Inauguration Ayodhya Railway Station Renamed As Ayodhya Dham

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Ayodhya Railway Station :  पुढील महिन्यात राम मंदिर (Ram Mandir) रामलल्लाच्या प्राण प्रतिष्ठापणेसाठीची लगबग सुरू आहे. मंदिरातील बांधकामाचे काम पूर्ण करण्यावर भर दिला जात आहे. तर, अयोध्येत जाण्यासाठी भाविकांसह राजकीय पक्षांचीही लगबग सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे आता अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्यात (Ayodhya Railway Station Renamed) आले आहे.  अयोध्या रेल्वे स्थानकाचे नाव आता ‘अयोध्या धाम’ (Ayodhya Railway Station Renamed As Ayodhya Dham) असणार आहे. रेल्वे प्रशासनाने बुधवारी रात्री उशिरा रेल्वे स्थानकाचे नाव बदलण्याचे आदेश जारी केले.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दोन दिवसांपूर्वी अयोध्येत जात तयारीचा आढावा घेतला होता. त्यावेळी त्यांनी रेल्वे स्टेशनचे नाव अयोध्या धाम ठेवावे अशी इच्छा व्यक्त केली होती. त्यानंतर आता स्टेशनचे नाव बदलण्यात आले आहे. 

एक जानेवारीपासून भाविकांसाठी खुलं होणार स्थानक

अयोध्या धाम रेल्वे स्थानक सज्ज असून 1 जानेवारीपासून सर्वसामान्य भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे. पंतप्रधान मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरूनच वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. याशिवाय पीएम मोदी श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही करणार आहेत.

 

30 डिसेंबरला पंतप्रधान मोदी करणार स्टेशनचे उद्घाटन

त्रेतायुगाचे दर्शन घडविण्याचे ठिकाण म्हणून अयोध्या रेल्वे स्थानक तयार करण्यात आले आहे. हे स्टेशन पाहून तुम्हाला एखाद्या भव्य मंदिरासारखे वाटेल. येथून एक किलोमीटर अंतरावर राम मंदिर आहे. या स्थानकाची अंदाजे 50 हजार प्रवासी क्षमता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 डिसेंबरला त्याचे उद्घाटन करणार आहेत.

रेल्वे स्थानकावर विशेष सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे.

याशिवाय पंतप्रधान मोदी अयोध्या धाम रेल्वे स्थानकावरूनच वंदे भारत आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवतील. श्री राम आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटनही पंतप्रधान मोदी करणार आहेत. कोटय़वधी रुपये खर्चून रेल्वे स्थानकाची इमारत मंदिर म्हणून विकसित करण्यात आली. प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा आहेत. लिफ्ट आणि एस्केलेटर बसवण्यात आले. तसेच अनेक मोठ्या सुरक्षा व्यवस्था करण्यात आल्या आहेत.
 

इतर महत्त्वाच्या बातम्या :

[ad_2]

Related posts