America Texas Car Crash Andhra Pradesh 6 Nri Died In Road Accident All Were Ysrcp Mla Ponnada Venkata Satish Kumar Relatives India Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

America Texas Car Accident : अमेरिकेत (America) एका भीषण अपघातात (Car Accident) सहा भारतीयांचा मृत्यू झाला आहे. टेक्सासच्या (Texas) अमेरिकन राज्यमार्ग 67 वर एक पिकअप ट्रक आणि मिनी व्हॅनचा मोठा अपघात झाला. या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच सदस्यांसह सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. सर्व मृत आंध्र प्रदेशचे रहिवासी असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. अमेरिकेत सुट्टीत फिरण्यासाठी गेलेल्या भारतीयांचा दुर्दैवी अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे.

नाताळच्या सुट्टीसाठी अमेरिकेत गेलेल्या 6 भारतीयांवर काळाचा घाला

टेक्सासमध्ये (Car Crash in Texas) पिकअप ट्रक आणि मिनी व्हॅनची धडक झाल्याने अपघात झाला, ज्यामध्ये सहा जणांचा मृत्यू झाला आहे. ट्रक चालकाच्या चुकीमुळे अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. अपघातातील मृत आंध प्रदेशच्या आमदाराचे नातेवाईक असल्याचं समोर आलं आहे. आंध्र प्रदेशच्या मुम्मीदीवरम विधानसभेचे वाईएसआर कांग्रेस पक्षाचे आमदार पोन्नाडा वेंकट सतीश कुमार ( Venkata Satish Kumar) यांनी माहिती देत सांगितलं आहे की, अपघातातील मृत त्यांचे नातेवाईक आहेत. 

भीषण अपघातात 6 जणांचा जागीच मृत्यू

अमेरिकेच्या टेक्सासमध्ये मंगळवारी ही दुर्दैवी घटना घडली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, महामार्गा 67 वर क्लेबर्न शहराजवळ हा अपघात झाल्याची माहिती आहे. पिकअप ट्रक आणि व्हॅनची समोरासमोर टक्कर झाली. या अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये पी नागेशवर राय, सीता महालक्ष्मी, नवीना, कृतिका, निशिता आणि आणखी एका व्यक्तीचा समावेश आहे. कारमधील एक व्यक्ती लोकेश यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सुदैवाने एक जण बचावला

अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला तर, लोकेश सुदैवाने बचावला. त्याला विमानाने रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, तेथे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातात ट्रक चालकाची चूक असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. ट्रक चालवत असलेला 17 वर्षीय अमेरिकन तरुण चुकीच्या दिशेने आला आणि त्याने कारला धडक दिल्याने हा अपघात झाल्याचं सांगितलं जात आहे. ट्रकमधून दोघे प्रवास करत होते, तेही जखमी झाले आहेत. त्याच्यावर उपचारही सुरू आहेत. कारमधून प्रवास करत असलेले कुटुंबातील सर्व सदस्य टेक्सासमध्ये विशाल नावाच्या दुसऱ्या नातेवाईकाच्या घरी नाताळची सुट्टी घालवण्यासाठी गेले होते. प्राणिसंग्रहालयाला भेट देऊन ते परतत होते, त्यावेळी त्यांचावर काळाने घाला घातला.

 

[ad_2]

Related posts