Morning Headlines Breaking National State News Live Headlines Bulletin Morning 29th December 2023 India Maharashtra Latest Update Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

देश-विदेशातील सकाळच्या महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील

पंतप्रधान मोदींचा उद्या अयोध्या दौरा, रेल्वे स्टेशन अन् विमानतळाचे उद्घाटन, तब्बल 11,100 कोटी रुपयांच्या प्रकल्पांची पायाभरणी 

 पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या ( 30 डिसेंबर 2023 ) उत्तर प्रदेशातील अयोध्येला भेट देणार आहेत. सकाळी सुमारे 11:15 वाजता पंतप्रधान अयोध्या रेल्वे स्थानकाचे उद्घाटन करतील आणि नवीन अमृत भारत गाड्या आणि वंदे भारत गाड्यांना हिरवा झेंडा दाखवतील. (वाचा सविस्तर)

 कोरोनानं चिंता वाढली, 9 महिन्यानंतर पश्चिम बंगालमध्ये मृत्यू, केरळमध्ये जेएन.1 विषाणूचे सर्वाधिक रुग्ण 

केरळमध्ये  जेएन.1 या नव्या सब व्हेरियंटचे 78 रुग्ण झाले आहेत. तर पश्चिम बंगालमध्ये 9 महिन्यानंतर कोरोनामुळे रुग्णाचा मृत्यू झालाय. पश्चिम बंगाल आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 9 महिन्यानंतर पहिल्यांदाच रुग्णांचा मृत्यू झालाय. याआधी 26 मार्च 2023 रोजी पश्चिम बंगालमध्ये रुग्णांचा मृत्यू झाला होता. (वाचा सविस्तर)

Ayodhya New Airport Name: अयोध्येतील विमानतळाचं नाव ठरलं, ‘ही’ असणार नवी ओळख, पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार उद्घाटन   

 अयोध्येतील (Ayodhya) नवीन विमानतळाचे (Airport) नाव महर्षि वाल्मिकी आंतरराष्ट्रीय विमानतळ अयोध्या धाम असे असणार आहे. एनआयएला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही बातमी समोर आली आहे. दरम्यान 27 डिसेंबर रोजी येथील रेल्वे स्थानकाचे नाव बदलून अयोध्या धाम जंक्शन  असे करण्यात आले आहे. (वाचा सविस्तर)

बॉक्सिंग डे कसोटीत भारताचा मोठा पराभव, आफ्रिकेने एक डाव आणि 32 धावांनी हरवलं

: बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने भारताचा (SA vs IND ) दारुण पराभव केलाय. टेम्बा बवुमाच्या दक्षिण आफ्रिका संघाने भारताचा (IND vs SA) एक डाव आणि 32 धावांनी पराभव केला. भारताने पहिल्या डावात 245 धावा केल्या होत्या. तर आफ्रिकेने 408 धावा करत मोठी आघाडी घेतली होती.  (वाचा सविस्तर)

Petrol Diesel Price : मोठी बातमी! पेट्रोल आणि डिझेल 7 ते 8 रुपयांनी कमी होण्याची शक्यता 

समस्त जनसामान्यांसाठी मोठी बातमी आहे. येत्या काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलचे दर 7 ते 8 रुपयांनी कमी (Petrol Diesel Price) होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मुंबईत पेट्रोल 106 रुपयांवरून 98 ते 99 रुपये प्रति लिटरवर येण्याची चिन्हं आहेत.  (वाचा सविस्तर)

Horoscope Today 29 December 2023 : आजचा शुक्रवार खास! सर्व 12 राशींसाठी दिवस कसा असेल? आजचे राशीभविष्य जाणून घ्या 

 राशीभविष्यानुसार आज म्हणजेच 29 डिसेंबर 2023 शुक्रवार हा महत्त्वाचा दिवस आहे. ग्रहांच्या चालीनुसार कर्क राशीच्या लोकांना आज खूप चांगला नफा मिळू शकतो, तर इतर व्यावसायिकांचा व्यवसायही चालू राहील. आज तूळ राशीच्या लोकांनो, तुमच्या क्रोधावर थोडे नियंत्रण ठेवा, सर्व राशीच्या लोकांसाठी शुक्रवार कसा राहील? सर्व 12 राशींचे आजचे राशीभविष्य जाणून घ्या (वाचा सविस्तर)

29 December In History : ‘रामायण’चे निर्माते रामानंद सागर, बॉलिवूडचा पहिला सुपरस्टार राजेश खन्ना यांचा जन्म, आज इतिहासात 

29 December In History : काँग्रेसच्या इतिहासात आजच्या दिवसाला मोठं महत्व आहे. आजच्याच दिवशी 1984 साली काँग्रेसने लोकसभेच्या 401 जागा जिंकून सर्वात मोठा विजय मिळवला. राजीव गांधींच्य नेतृत्वाखाली त्या निवडणुका लढवण्यात आल्या होत्या. त्याच्या आधी दोन महिन्यांपूर्वी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांची हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आलेल्या सहानुभूतीच्या लाटेमध्ये विरोधी पक्षांचा धुव्वा उडाला आणि राजीव गांधी पंतप्रधान झाले.    (वाचा सविस्तर)

 

[ad_2]

Related posts