[ad_1]
( प्रगत भारत । pragatbharat.com)
Bank Holidays in January 2024: नवीन वर्ष 2024 (New Year 2024) सुरु होण्यास अवघे 3 दिवस बाकी आहेत. या नवीन वर्षात बँका किती दिवस बंद राहणार याची यादी RBI कडून जाहीर करण्यात आली आहे. दरम्यान, नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी (1 जानेवारी 2024) बँका बंद राहणार आहेत. दरम्यान, संपूर्ण जानेवारी महिन्यात एकूण 16 दिवस बँका बंद राहणार आहेत. सणासुदीच्या दिवसांव्यतिरिक्त, त्यात शनिवार आणि रविवार या सुट्ट्यांचाही समावेश आहे.
नवीन वर्षाची सुरुवात सुट्टीने होणार आहे. अनेक शहरांमध्ये पहिली तारीख नवीन वर्षाची सुट्टी म्हणून साजरी केली जाईल, त्यामुळे बँका बंद राहतील. याशिवाय लोहरी, मकर संक्रांती (जानेवारी सणांची यादी) असे अनेक सण असणार आहेत. ज्यामुळं बँकेला सुट्ट्या देण्यात येणार आहेत.
जानेवारी महिन्यात ‘या’ दिवशी बँका राहणार बंद
1 जानेवारी – नवीन वर्ष
2 जानेवारी – नवीन वर्षाचा उत्सव
11 जानेवारी – मिशनरी दिवस
15 जानेवारी- उत्तरायण पुण्यकाल/मकर संक्रांती/माघ संक्रांती/पोंगल/माघ बिहू
16 जानेवारी- तिरुवल्लुवर दिवस
17 जानेवारी- उजावर तिरुनाल/श्री गुरु गोविंद सिंग यांचा जन्मदिन
22 जानेवारी- इमोइनू इराप्टा
23 जानेवारी- गान-नगाई
25 जानेवारी- थाई पूसम/मोहम्मद हजरत अली जयंती
26 जानेवारी – प्रजासत्ताक दिन
वीकेंडची सुटी कधी पडेल?
7 जानेवारी- रविवार
13 जानेवारी- दुसरा शनिवार
14 जानेवारी- रविवार
21 जानेवारी- रविवार
27 जानेवारी- चौथा शनिवार
28 जानेवारी- रविवार
दरम्यान, रिझव्र्ह बँकेने बँकांसाठी तीन श्रेणींमध्ये सुट्ट्या दिल्या आहे. निगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ऍक्ट अंतर्गत सुट्टी आणि रिअल टाइम ग्रॉस सेटलमेंट हॉलिडे आणि बँकांची खाती बंद करणे. पण या सुट्ट्या वेगवेगळ्या राज्यांनुसार लागू होतात. उदाहरणार्थ, काही सण प्रादेशिक आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी संपूर्ण देशात सुट्टी नाही, फक्त संबंधित क्षेत्रातील बँका बंद राहतात. या सुट्यांमध्ये तुम्ही ते काम पूर्ण करू शकत नाही ज्यासाठी तुम्हाला बँकेत जावे लागेल. परंतु बँका बंद असतानाही तुम्ही ऑनलाइन/मोबाइल बँकिंग करू शकता. डिजिटल बँकिंग आणि पेमेंट इत्यादी सुविधा यापुढेही उपलब्ध राहणार आहे.
नवीन वर्षात 50 दिवस बँका राहणार बंद
नवीन वर्ष (New Year 2024) सुरु होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिलेत. नवीन वर्षात अनेक दिवस बँकांना सुट्ट्या राहणार आहेत. तुमचीही बँकेसंबंधित काही कामे करायची असतील तर पुढच्या वर्षी येणाऱ्या बँकेच्या सुट्ट्यांची यादी एकदा तपासून पाहा आणि मगच कामे करा. जानेवारी महिन्यातच बँका 16 दिवस बंद राहणार आहेत. रिझर्व्ह बँकेने 2024 च्या सुट्ट्यांची यादी जाहीर केली आहे. या संपूर्ण वर्षात 50 दिवस बँका बंद राहणार आहे, त्यामुळे सुट्ट्यांची यादी पाहा आणि त्यानुसार तुमच्या कामांचं नियोजन करा.
महत्वाच्या बातम्या:
[ad_2]