( प्रगत भारत । pragatbharat.com)
Chinese Women Rent Service : जगात नव नवीन गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळत आहेत. कोणाला कधी काय करायला आवडेल हे काही सांगता येत नाही. चीनमधील बीजिंगची एक मुलगी केवळ एक युआनमध्ये (14 यूएस सेंट आणि भारतीय 11.61 रुपये) स्वतःला भाड्याने (Rent)देत आहे. याचे कारण तर धक्कादायक आहे. तिने पदवीचे शिक्षण घेतले आहे. त्यानंतर जॉब केले. पण हे जॉब तिला आवडले नाहीत. त्यानंतर तिने स्वत:ला Rent देण्याचा निर्णय घेतला. पेगी म्हणून ओळखली जाणारी 26 वर्षीय तरुणी मे महिन्यापासून चिनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Xiaohongshu वर सेवा देत आहे.
साऊथ मॉर्निंग चायना पोस्टच्या वृत्तानुसार, या तरुणीचे म्हणणे आहे की, ‘लोकांसोबत अशा गोष्टी करायच्या आहेत ती त्यांच्याशिवाय एकट्याने करु शकत नाही. तसेच त्या करण्याची तिच्यात हिंमत नाही’ कारण तिला स्वत:ला जिवंत वाटले पाहिजे.
आतापर्यंत तिला तीन लोकांनी Rent वर घेतले आहे. एक “लाजाळू” प्रोग्रामर ज्याला उद्यानात फुगे विकायचे आहेत. दुसरा “एकटा” आहे. तो पदवीधर आहे. ज्याला रॉक क्लाइंबिंगमध्ये जायचे आहे आणि तिसरा आहे मॅकडोनाल्डच्या चिल्ड्रन्स डे गेम्स इव्हेंटमध्ये भाग घेऊ इच्छिणारा.
पेगी ही पदवीधर
वायव्य चीनमधील झिंजियांग उइगुर स्वायत्त प्रदेशातील एक प्रवासी पेगीने बीजिंगमधील विद्यापीठातून पदवी प्राप्त केल्यानंतर प्रदेशाची राजधानी उरुमकी येथे काम शोधण्याचा प्रयत्न केला. परंतु ती ते काम करु शकली नाही. प्रदर्शन आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची चाहती असणाऱ्या पेगीने 2021 मध्ये बीजिंगला परतण्याचा निर्णय घेतला .
‘जीवनाचा अर्थ शोधण्याचा’ प्रयत्न
पेगीने अनेक नोकऱ्या केल्या. पण तिचा जीव त्यात गुंतला नाही. तसेच एकही नोकरी तिला आवडली नाही. त्यानंतर पेगीने ‘जीवनाचा अर्थ शोधण्याच्या’ प्रयत्नात स्वत:ला अनोळखी लोकांना भाड्याने देण्यास सुरुवात केली. पेगी म्हणाली की तिची एक युआनची नाममात्र फी ही केवळ एक प्रकारची औपचारिकता होती. कामादरम्यान झालेला कोणताही खर्च भाड्याने घेणाऱ्या व्यक्तीने भरावा.
चीनचे लोक स्वतःला भाड्याने का देतात?
चीनमधील लोकांनी स्वतःला भाड्याने देऊन हेडलाइन बनवण्याची किंवा प्रसिद्धी झोतात राहण्याची ही पहिलीच वेळ नाही. अलिकड काळात, पार्टनर रेंटल सेवा देखील व्हायरल झाल्या आहेत, काही अविवाहित लोक बॉयफ्रेंड किंवा प्रेयसीला लग्नाचा दबाव कमी करण्यासाठी त्यांच्या पालकांकडे घरी घेऊन जाण्यासाठी नियुक्त करतात.