Uday Kotak Said Seven Ways To Make India A 30 Trillion Dollar Economy Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

30 Trillion Dollar Economy: ज्येष्ठ बँकर आणि कोटक महिंद्रा बँकेचे संस्थापक उदय कोटक (Uday Kotak) यांनी भारताची अर्थव्यवस्था (Indian Economy) 30 ट्रिलियन डॉलरची होण्यासाठी 7 सूचना सांगितल्या आहेत. याकडे लक्ष दिल्यास भारत स्वातंत्र्याच्या 100 व्या वर्षात मोठे उद्दिष्ट साध्य करेल, असे मत कोटक यांनी व्यक्त केलं आहे. याबद्दल अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

पूर्वी भारतीय लोक फक्त सोने आणि मालमत्तेत गुंतवणूक करत होते 

बँकिंग जगतातील दिग्गज मानले जाणारे उदय कोटक यांनी 30 ट्रिलियन डॉलर जीडीपीचे लक्ष्य साध्य करण्यासाठी 7 सूचना दिल्या होत्या. गुंतवणूकदारांसाठी केलेल्या सुधारणांबाबतही त्यांनी चर्चा केली. ते म्हणाले की, 80 च्या दशकात गुंतवणूकदार फक्त सोने आणि मालमत्तेत गुंतवणूक करत असत. गुंतवणुकीच्या इतर पर्यायांवर त्याचा भरवसा नव्हता. त्यानंतर 90 च्या दशकात लोकांनी बँका, UTI आणि LIC मध्ये गुंतवणूक करायला सुरुवात केली.

उदय कोटक यांच्या मते, इक्विटीमध्ये गुंतवणूक करणे कल्पनेपलीकडचे मानले जात होते. त्यामुळे भांडवलासाठी कंपन्या एफआयआयच्या शोधात होत्या. लक्झेंबर्ग स्टॉक एक्स्चेंजसारख्या छोट्या ठिकाणाहूनही कंपन्यांना पैसे उभे करावे लागले. भारताचा भांडवली बाजार बाहेर जात होता. मात्र, 2000 सालापासून परिस्थिती बदलली. म्युच्युअल फंड, कॅश इक्विटी आणि डेरिव्हेटिव्ह मार्केट्स, इन्शुरन्स फंड, ग्लोबल प्रायव्हेट इक्विटी, एआयएफ आणि इक्विटीजवरील कर प्रणालीतील बदलांनी बचतकर्त्यांचे गुंतवणूकदारांमध्ये रुपांतर केले.

उदय कोटक यांनी केल्या ‘या’ 7 सूचना 

धोरणे, नियम आणि लोकांचे प्रबोधन करून शंका दूर कराव्या लागतील. कमी किमतीत इक्विटी देऊन कंपन्यांना भांडवल सकारात्मक कामांसाठी वापरावे लागेल.
देशात कर्जावरील कर टाळले पाहिजे.
लाभांशावरील दुहेरी कर टाळण्याची गरज 
डेरिव्हेटिव्हजद्वारे कमी किमतीत नफा ऑफर केल्याने आर्थिक बाजारावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो, याकडे लक्ष दिले पाहिजे.
बँकांनी लघु उद्योग, मध्यम कॉर्पोरेट्स आणि ग्राहकांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक 
कर आणि नियामक तरतुदी सुलभ करणे आवश्यक 
संपादनासाठी भांडवल आणि IBC आणि NCLT प्रक्रियेकडे त्वरित लक्ष दिले पाहिजे.

अर्थमंत्री सीतारामन आणि सुरेश प्रभू यांनी कोटक यांचं केलं कौतुक 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी उदय कोटक यांचे आभार मानले आहेत. बँकिंग क्षेत्रातील तुमचा अनुभव अफाट असल्याचे सांगितले. माजी रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनीही उदय कोटक यांच्या सूचनांचे कौतुक केले आहे. गुरुवारीच आरबीआयने उदय कोटक यांच्या जागी सीएस राजन यांची कोटक महिंद्रा बँकेचे नवे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली होती. उदय कोटक यांनी बँकेचे एमडी आणि अध्यक्षपद सोडले आहे.

महत्वाच्या बातम्या:

कोरोना संकटानंतर भारतीय अर्थव्यवस्था अधिक मजबूत, जाणून घ्या नेमके काय झाले बदल?

[ad_2]

Related posts