Prime Minister Narendra Modi Ayodhya Visit Said 4 Crore People Of The Country Got A Secure Home Detail Marathi News

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी शनिवार 30 डिसेंबर रोजी अयोध्येचा (Ayodhya) दौरा केला. यावेळी त्यांनी अयोध्येतील रेल्वे स्थानकाचे उद्घाटन केले, तसेच त्यांनी वंदे भारत (Vande Bharat Train) आणि अमृत भारत ट्रेनला हिरवा झेंडा दाखवला. या लोकार्पणाच्या सोहळ्यावेळी पंतप्रधान मोदी यांनी जनतेला संबोधित देखील केले. यावेळी त्यांनी म्हटलं की, मागील 9 वर्षात भारताने पायाभूत सुविधा आणि कनेक्टिव्हिटीचा विश्वस्तरावर अभूतपूर्व विस्तार केलाय. त्यामुळे फक्त रामरायालाच नाही तर देशातील 4 कोटी लोकांना पक्की घरं मिळाली आहेत. 

अयोध्येतील विविध विकास कामांचे देखील यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतील विविध कामांचे देखील लोकार्पण केले. यावर त्यांनी म्हटलं की, राममय असलेल्या अयोध्या धाममध्ये आज विविध विकास कामांचे लोकार्पण आणि शिलान्यास करुन मला अभिमान वाटत आहे. 

22 जानेवारी संपूर्ण जगाला उत्सुकता 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं की, आज संपूर्ण जग 22 जानेवारीच्या ऐतिहासिक क्षणाची आतुरतेने वाट पाहत आहे.  अशा स्थितीत अयोध्यावासीयांमध्ये हा जल्लोष आणि उत्साह स्वाभाविक आहे. मी भारताच्या मातीच्या प्रत्येक कणाचा आणि भारतातील लोकांचा पूजक आहे आणि मलाही तुमच्यासारखाच जिज्ञासू आहे.

4 कोटी लोकांना मिळाली पक्की घरं 

एक वेळ अशी होती की अयोध्येमध्ये रामलल्ला तंबूत राहत होता. आता रामाला त्याचं पक्क घरं मिळालं आहे. पण फक्त रामरायालाच नाही कर देशातील 4 कोटी गरीब जनतेला देखील पक्की घरं मिळाली आहेत. आज आम्ही प्रत्येक घरात पाणी पोहोचवत आहोत. देशात केवळ महाकाल महालोकाचीच निर्मिती झाली नाही, तर प्रत्येक घरात पाणीपुरवठा करण्यासाठी 2 लाखांहून अधिक पाण्याच्या टाक्याही बांधल्या गेल्या आहेत, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. 

सरकार अयोध्येला स्मार्ट बनवणार

अयोध्येमधील विविध विकास कामांचे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी लोकार्पण केले. यावेळी त्यांनी म्हटलं की, आज मला अयोध्या धाम विमानतळ आणि रेल्वे स्थानकाचं उद्घाटन करण्याचं सौभाग्य मिळालं आहे. मला आनंद होतोय की अयोध्या विमानतळाचं नाव हे महर्षि वाल्मिकी यांच्यावरुन ठेवण्यात आले. येथे श्री रामाचे भव्य मंदिर उभारल्यानंतर येथे येणाऱ्या लोकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. हे लक्षात घेऊन आमचे सरकार अयोध्येत हजारो कोटी रुपयांची विकासकामे करत आहे आणि अयोध्येला स्मार्ट बनवत आहे.

अयोध्या धाम स्थानकातून दररोज 60 हजार लोक प्रवास करणार 

पंतप्रधान म्हणाले की, सध्या अयोध्या धाम रेल्वे स्थानकाची एकूण क्षमता 10-15 हजार लोकांना सेवा देण्याची आहे. मात्र, रेल्वे स्थानक पूर्ण विकसित झाल्यावर येथून दररोज ६० हजार लोकांना प्रवास करता येणार आहे.

हेही वाचा : 

PM Modi : नववर्षाआधीच पंतप्रधान मोदींची देशवासियांना मोठी भेट! अयोध्या रेलवे स्टेशन आणि विमानतळाचं उद्घाटन



[ad_2]

Related posts