Prakash Ambedkar President Of Vanchit Bahujan Aghadi Meet To NCP President Sharad Pawar At Modi Baug Pune But Ambedkar Refuse It

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Prakash Ambedkar meet Sharad Pawar :  वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यात भेट झाली असल्याची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. प्रकाश आंबेडकर हे शनिवारी रात्री पुण्यातील शरद पवार राहत असलेल्या मोदी बाग या सोसायटीत आल्याने राजकिय निरीक्षकांच्या भुवया ऊंचावल्या आहेत. तर, प्रकाश आंबेडकर यांनी पवारांसोबत भेट झाल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. 

मागील काही दिवसांपासून विरोधकांच्या इंडिया आघाडीत येण्यासाठी प्रकाश आंबेडकर यांच्या  वंचित बहुजन आघाडीकडून जोर दिला जात आहे. तर, वंचितच्या समावेशाबाबत इंडिया आघाडीच्या बैठकीत आपण चर्चा केली असल्याचे शरद पवार यांनी म्हणत, वंचितबाबत सकारात्मकता दाखवली. त्यानंतर प्रकाश आंबेडकर आणि शरद पवार यांच्यात भेट झाल्याच्या वृत्ताने चर्चांना उधाण आले. 

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हे शनिवारी रात्री पुण्यातील शरद पवार रहात असलेल्या मोदी बाग या सोसायटीत आले. मात्र,  प्रकाश आंबेडकरांनी मोदी बाग या सोसायटीत राहणाऱ्या आपल्या बहिणीला भेटण्यासाठी आपण आल्याच स्पष्ट केलं. या दरम्यान शरद पवारांची आणि आपली भेट झाल्याचा त्यांनी इन्कार केला आहे.

प्रकाश आंबेडकर हे इंडीया आघाडीत जाण्यास इच्छुक असून शरद पवारांनी देखील त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. काही दिवसांपूर्वी या दोन नेत्यांची मुंबईत भेट झाली होती.

मोदी यांना सत्तेतून हटवणे हा आमचा मुख्य अजेंडा: वंचित बहुजन आघाडी 

नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवणे हा आमचा मुख्य अजेंडा आहे असं सांगत वंचित बहुजन आघाडीने (Vanchit Bahujan Aghadi) महाराष्ट्रातील लोकसभेच्या जागावाटपाचा फॉर्म्युला जाहीर केला. महाराष्ट्रातील विरोधी पक्षाने प्रत्येकी 12 जागांवर निवडणूक लढवावी असं वंचितकडून आवाहन करण्यात आलं आहे. 

काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि वंचित बहुजन आघाडी या चार पक्षांमध्ये लोकसभेच्या 48 जागांची समान विभागणी करावी. प्रत्येकी 12 जागा घेऊन सर्व पक्षांनी एकत्रित मोदींचा पराभव करावा असा आमचा फॉर्म्युला असल्याचे वंचित बहुजन आघाडीच्या प्रदेशाध्यक्षा रेखाताई ठाकूर यांनी सांगितले. आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी औरंगाबाद येथे वंचित बहुजन आघाडीच्या राज्य कार्यकारणीची बैठक पार पडल्यानंतर पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी त्या बोलत होत्या. 

 

[ad_2]

Related posts