Ganesh Visarjan 2023 : अनंत चतुर्दशीचं व्रत देणार 14 वर्षे लाभ! जाणून घ्या पूजाविधी, मंत्र, Ganesh Visarjan शुभ मुहूर्त

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Anant Chaturdashi 2023 : भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाणार आहे. पंचांगानुसार गुरुवारी 28 सप्टेंबरला साजरी केली जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केली जाणार आहे. त्यासोबत गणपती बाप्पा गावी जाणार आहे. या दिवशी भगवान विष्णूला प्रसन्न करण्यासाठी धार्मिक कार्य आणि उपवास केला जातो. 

दुसरीकडे 28 सप्टेंबरला जैन अनुयायांचा पर्युषण उत्सव समाप्त होणार आहे. तसंच 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीसोबत ईद मिलाद उन नबी 2023 (Eid Milad un Nabi) साजरा करण्यात येणार आहे. ग्रह गोचरच्या दृष्टीकोनातूनही हा दिवस अतिशय महत्त्व पूर्ण आहे. कारण चंद्रदेव मीन राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे या दिवसाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. चला तर मग जाणून घेऊयात विष्णूपूजा, अनंत चतुर्दशी मुहूर्त, मंत्र आणि गणपती विसर्जन शुभ मुहूर्त जाणून घेऊयात. (anant chaturdashi 28 september 2023 puja time vidhi mantra and ganesh visarjan shubh muhurat)

अनंत चतुर्दशी 2023 मुहूर्त (anant chaturdashi 2023 muhurat)

भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथी –  27 सप्टेंबर 2023 ला रात्री 10:18 वाजेपासून 28 सप्टेंबर 2023 ला संध्याकाळी 06:49 वाजेपर्यंत 

विष्णू पूजेची वेळ –  28 सप्टेंबर 2023 ला सकाळी 06.12 ते संध्याकाळी 06.49 वाजेपर्यंत 

अनंत चतुर्दशी 2023 गणेश विसर्जन मुहूर्त (ganesh visarjan 2023 shubh muhurat)

पहिला मुहूर्त – सकाळी 06.11 ते सकाळी 07.40 वाजेपर्यंत 
दुसरा मुहूर्त- सकाळी 10.42 ते दुपारी 3.10 वाजेपर्यंत 
तिसरा मुहूर्त- दुपारी 4.41 ते रात्री 9.10 वाजेपर्यंत 

अनंत चतुर्दशी दुर्मिळ योग!

पंचांगानुसार अनंत चतुर्दशीला सर्वात शुभ असा वृद्धी योग आणि त्यासोबत रवियोग आहे. रवियोग सकाळी 06:12 पासून दिवसभर आहे. त्यासोबत पूर्वा भाद्रपद नक्षत्र दिवसभर असून 28 सप्टेंबर 2023 ला दुपारी 1.48 पर्यंत असणार आहे. हे नक्षत्र ज्योतिषशास्त्रानुसार अतिशय फलदायी मानले जाते. 

अनंत चतुर्दशी पूजा विधी 

सकाळी लवकर उठून आंघोळ करु स्वच्छ कपडे परिधान करा. त्यानंतर पूजास्थानी गंगाजल शिंपडून पूजास्थळ पवित्र करा. त्यानंतर एका चौरंग किंवा पाटावर भगवान विष्णूची मूर्ती किंवा चित्राची स्थापना करा. अक्षता, फुलं, धूप, दिवा, नैवेद्या, अत्तर, चंदनाने पूजा करा. आता विष्णूची आरती करुन मंत्रांचा जप कर. पूजेनंतर रक्षासूत्र नक्की धारण करा. 

मंत्र 

अनंत संसार महासमुद्रमग्नं समभ्युद्धर वासुदेव| अनंतरूपे विनियोजयस्वह्मनंतसूत्राय नमो नमस्ते||

(Disclaimer – या ठिकाणी दिलेली माहिती ज्योतिष शास्त्रावर आधारित असून ती केवळ माहितीसाठी दिली जात आहे. झी 24 तास या गोष्टींना दुजोरा देत नाही. कोणताही उपाय करण्यापूर्वी संबंधित विषयातील तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या.)

Related posts