IndiGo Passenger Finds Worm In Sandwich Served On Flight Airline Responds

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Indigo Flight : दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या एका महिला प्रवाशाला इंडिगो एअरलाइन्सच्या (Indigo Airlines) फ्लाइटमध्ये दिलेल्या सँडविचमध्ये किडे सापडले आहेत. महिलेने या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. यानंतर इंडिगो एअरलाइनने याप्रकरणी स्पष्टीकरण दिले असून महिला प्रवाशाची माफीही मागितली आहे.

सँडविचमध्ये आढळला कीडा 

मिळालेल्या माहितीनुसार, खुशबू गुप्ता ही महिला शुक्रवारी दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइट क्रमांक 6E 6107 मध्ये बसली होती. या प्रवासात तिने एक सँडविच मागवला. या सँडविच मध्ये कीडा असल्याचे दिसून आले. यानंतर तिने एक व्हिडिओ बनवला आणि तो इंस्टाग्रामवर शेअर केला. यावर अनेक कमेंट्स आल्या. 


इंडिगोने मागितली माफी 

इंडिगो एअरलाइनच्या प्रवक्त्याने सांगितले की, आम्हाला या घटनेची माहिती मिळाली आहे. संबंधित प्रवाशी दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये होता. आमच्या फ्लाइट क्रूने तपासणीनंतर सँडविच वाटणे बंद केले. आम्ही केटरिंग सेवा देणाऱ्या कंपनीला या प्रकरणाची माहिती दिली आहे. आम्ही भविष्यात अधिक चांगली सेवा देण्याचा प्रयत्न करू.प्रवाशाच्या गैरसोयीबद्दल आम्ही दिलगीर आहोत असेही कंपनीच्या प्रवक्त्याने म्हटले. 

इंस्टाग्राम व्हिडीओमध्ये खाद्यपदार्थांच्या दर्जावर प्रश्न

इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये महिलेने इंडिगो एअरलाइन्समध्ये दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या दर्जावर प्रश्न उपस्थित केला होता. तक्रार करूनही केबिन क्रू इतर लोकांना कीटकांसह सँडविच वितरित करत आहे. विमान कर्मचाऱ्यांच्या प्रशिक्षणावरही या महिला प्रवाशाने प्रश्न उपस्थित केला. अशा खाद्यपदार्थांमुळे कुणाला संसर्ग झाल्यास जबाबदार कोण असेल, असा सवालही उपस्थित करण्यात आला. 



[ad_2]

Related posts