Eknath Khadse NCP Leader Saying He Is Interested To Contest Raver Lok Sabha Election Against Daughter In Law MP Raksha Khadse

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

Raver Lok Sabha :  आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काही दिवसांचाच अवधी राहिला आहे. त्यादृष्टीने सगळ्याच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते आमदार एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी दंड थोपटले आहेत. रावेर लोकसभेची (Raver Lok Sabha)  जागा पक्षाला मिळावी आणि ती मिळाल्यास उमेदवारीसाठी आपला विचार व्हावा अशी विनंती पक्षाला केली असल्याचे एकनाथ खडसे यांनी सांगितले. सध्या रावेर लोकसभेचे प्रतिनिधीत्व एकनाथ खडसे यांची सून खासदार रक्षा खडसे (Raksha Khadse) करत आहेत. त्यांनीदेखील पक्षाने संधी दिल्यास निवडणूक लढवणार असल्याचे म्हटले आहे. 

आगामी वर्ष हे आचारसंहितेचे आणि निवडणुकीचे वर्ष राहणार असल्याची प्रतिक्रिया एकनाथ खडसे यांनी दिली आहे. खडसे यांनी म्हटले की, रावेर लोकसभा मतदार संघाची जागा राष्ट्रवादी पक्षाला मिळावी यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. ही जागा राष्ट्रवादीला सुटली तर या ठिकाणची उमेदवारी आपल्याला प्राधान्याने मिळावी अशी विनंती आपण पक्षाकडे केली असल्याचे त्यांनी म्हटले. प्रकृती बाबत आपली अडचण असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याने याबाबत आपण निर्णय घेणार आहोत. निवडणूक लढविण्यास आपण उत्सुक असल्याचे  एकनाथ खडसे यांनी स्पष्ट केले. 

पक्षाने संधी दिल्यास पुन्हा निवडणुकीत उतरणार

रावेर मतदारसंघात एकनाथ खडसे यांनी आपण राष्ट्रवादी पक्षाकडून उमेदवार म्हणून इच्छुक असल्याचे सांगितले असताना दुसरीकडे सांगितलं असताना खासदार रक्षा खडसे यांनी ही  पक्षाने आपल्याला दोन वेळा संधी दिली आहे. पुन्हा जर पक्षाने तिसऱ्या वेळेस संधी दिली आपण  ही उमेदवार म्हणून तयार अह आहोत असे सासरे एकनाथ खडसे यांना प्रति आव्हान दिले आहे. गेल्या पाच वर्ष पासूनच निवडून आल्यापासून आपण तयार असतोच आताही तयार आहे. पक्ष काय निर्णय घेतो ते आता पहावे लागणार असल्याचं खासदार रक्षा खडसे यांनी म्हटले आहे.

खासदार रक्षा खडसे आणि त्यांचे सासरे एकनाथ खडसे यांनी दोघांनीही रावेर मतदारसंघसाठी आपण  इच्छुक असल्याचे सांगितल्याने एकाच घरात सून विरुद्ध सासरे अशी लढाई होण्याची चिन्हे आता दिसू लागली आहेत. 

[ad_2]

Related posts