ABP News C Voter Survey Abrogation Of Article 370 And Construction Of Ram Temple How Much Big Achievement Of Bjp Lok Sabha Elections Maharashtra

[ad_1]

( प्रगत भारत । pragatbharat.com)

ABP Cvoter Survey: आज इंग्रजी नववर्षाचा (New Year 2024) पहिला दिवस. नवंवर्ष हे निवडणुकाचं वर्ष असणार आहे. प्रत्येक पक्षानं यासाठी तयारी सुरू केली आहे. 2024 मध्ये देशभरात सार्वत्रिक निवडणुका (Elections 2024) होणार आहेत. निवडणुकीपूर्वी, एबीपी न्यूजच्या सी व्होटरनं (ABP News C Voter Survey) देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कामगिरीवर एक सर्वेक्षण केलं आहे.

एबीपी न्यूज आणि सी व्होटरच्या सर्वेक्षणात 2 हजार 263 लोकांची मतं जाणून घेण्यात आली आहेत. हे सर्वेक्षण 30 डिसेंबर रोजी करण्यात आलं आहे. सर्वेक्षणात मार्जिन ऑफ एरर प्लस मायनस 3 ते प्लस मायनस 5 टक्के आहे. या सर्वेक्षणात लोकांनी धक्कादायक प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवण्याच्या निर्णयाकडे तुम्ही कसं पाहता? 

56 टक्के लोकांचं म्हणणं आहे की, मोदी सरकारनं कलम 370 हटवण्याचा घेतलेला निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे, तसेच, मोदी सरकारचं हे पाऊल आगामी काळातील निवडणुकांमध्ये भाजपसाठी महत्त्वाचं ठरणार आहे. तर 15 टक्के लोकांनी हा निर्णय भाजपसाठी आगामी निवडणुकांमध्ये काहीसा सकारात्मक ठरू शकतो, असं म्हटलं आहे. 13 टक्के लोकांनी याला भाजपच्या या निर्णयाला निवडणुकांमध्ये फारसं महत्त्व मिळणार नसल्याचं म्हटलं आहे. तर, 11 टक्के लोकांनी या निर्णयामुळे भाजपला आगामी निवडणुकांमध्ये अजिबात फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, 5 टक्के लोकांनी या प्रश्नाचं उत्तर देणंच टाळलं आहे. 

मोदी सरकारच्या काळात राम मंदिराच्या उभारणीबाबत तुमचं मत काय?

मोदी सरकारच्या काळात राम मंदिराच्या उभारणीबाबत तुमचं मत काय? सर्वेक्षणात या प्रश्नाचं उत्तर देताना लोकांनी आपापली मतं मांडली आहेत. या प्रश्नाचं उत्तर देताना 55 टक्के लोकांनी हे मोदी सरकारचं महत्त्वाचं पाऊल असल्याचं म्हटलं आहे. तर, 11 टक्के याला भाजपच्या या निर्णयाला निवडणुकांमध्ये फारसं महत्त्व मिळणार नसल्याचं म्हटलं आहे. तर, 15 टक्के लोकांनी मोदी सरकारनं उचललेलं पाऊल महत्त्वाची उपलब्धी नसल्याचे सांगितले. 14 टक्के या निर्णयामुळे भाजपला आगामी निवडणुकांमध्ये अजिबात फायदा होणार नसल्याचं म्हटलं आहे. तसेच, 5 टक्के लोकांनी या प्रश्नाचं उत्तर देणंच टाळलं आहे. 

आगामी निवडणुकीत भाजपसाठी महत्त्वाचे मुद्दे कोणते? 

राम मंदिराची निर्मिती आणि कलम 370 हटवणं हे भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचे मुद्दे ठरणार आहेत. पक्ष नेहमीच राम मंदिर उभारणीच्या बाजूनं राहिला आहे. भाजपनं गेल्या लोकसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात म्हटलं होतं की, सत्तेत आल्यास कलम 370 हटवण्याचा प्रयत्न करू. त्यानंतर भाजपला सत्ता मिळाली आणि भाजपनं आपलं आश्वासन पूर्ण केलं. त्यामुळे आगामी निवडणुकीत भाजपला याचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. 

2019 मध्ये सत्तेत आल्यानंतर, मोदी सरकारनं 5 ऑगस्ट 2019 रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 रद्द केलं आणि राज्याचे जम्मू-काश्मीर आणि लडाख असे दोन भाग केले आहेत. तसेच, त्याच वर्षी नोव्हेंबरमध्ये सर्वोच्च न्यायालयानं बाबरी मशीद वादावर निर्णय दिला आणि त्यावर हिंदूंचा अधिकार असल्याचं सांगितलं.  

[ad_2]

Related posts